ऐन दिवाळीच्या तोंडावर मेगाब्लॉक, 'या' मार्गे जाणाऱ्या पुण्याच्या तसेच मुंबईच्या रेल्वे बंद

All four trains from Osmanabad to Mumbai and Pune are closed : उस्मानाबाद मार्गे प्रामुख्याने पुणेव मुंबईला जाणाऱ्या लातूर ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स (मुंबई), छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स ते बिदर, नांदेड ते पनवेल, हैदराबाद ते हडपसर या रेल्वे धावतात.

All four trains from Osmanabad to Mumbai and Pune are closed
All four trains from Osmanabad to Mumbai and Pune are closed  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • लोहमार्गाच्या दुहेरीकरणासाठी रेल्वेचा मेगाब्लॉक सुरू करण्यात आला आहे
  •  १४ ऑक्टोबरपासून या फेऱ्या बंद असून २८ ऑक्टोबरपर्यंत त्या बंद राहतील
  • नवरात्र व आश्विनी पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर अनेक भाविक तुळजापूरला तुळजाभवानीच्या दर्शनासाठी रेल्वेने येतात.

उस्मानाबाद : ऐन दिवाळीच्या तोंडावर लोहमार्गाच्या दुहेरीकरणासाठी रेल्वेचा मेगाब्लॉक सुरू करण्यात आला आहे. यामुळे उस्मानबादमार्गे मुंबई, पुण्याकडे जाणाऱ्या सर्व चारही रेल्वेच्या फेऱ्या बंद करण्यात आल्या आहेत. गुरुवारपासून म्हणजेच १४ ऑक्टोबरपासून या फेऱ्या बंद असून २८ ऑक्टोबरपर्यंत त्या बंद राहतील. यामुळे उस्मानाबादसह लातूर जिल्ह्यातील प्रवाशांची गोची झाली आहे.

अनेक चाकरमाने या कालावधीतच आपल्या गावाकडे परतत असतात. त्यांना आता भाड्याचा अधिक भुर्दंड सहन करावा लागणार आहे. दरम्यान, मेगाब्लॉकच्या पार्श्वभूमीवर परिवहन महामंडळानेही नियोजन केले असून प्रवाशांचा प्रतिसाद पाहून मुंबई, पुण्याच्या फेऱ्या वाढवण्यात येणार आहेत. लोहमार्गाचेदुहेरीकरण व अन्य किरकोळकामांसाठी तब्बल १४ दिवसांचा मेगाब्लॉक रेल्वेने सुरू केला आहे. याचा परिणाम रेल्वेच्या नियमित वाहतुकीवर झाला आहे. तब्बल १४ ये-जा करणाऱ्या रेल्वेच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या असून ३३ रेल्वेच्या फेऱ्या मुळ मार्गावरून अन्यत्र वळवण्यात आल्या आहेत.

तसेच दोन रेल्वेच्या फेऱ्या अंशत: वळवण्यात आल्या आहेत. यामध्ये सर्वाधिक फटका उस्मानाबाद, लातूर मार्गे जाणाऱ्या तसेच गडग व सोलापूरच्या रेल्वेंना बसला आहे. उस्मानाबाद मार्गे प्रामुख्याने पुणेव मुंबईला जाणाऱ्या लातूर ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स (मुंबई), छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स ते बिदर, नांदेड ते पणवेल, हैदराबाद ते हडपसर या रेल्वे धावतात. तसेच याच रेल्वे उलट मार्गेही धावतात. अन्य वेळीच या सर्व रेल्वेना मोठ्याप्रमाणात गर्दी असते. बहुतांशवेळी तर उस्मानाबादच्या प्रवाशांना जागाही उपलब्ध नसते. आरक्षण २० ते ३० अगोदरपासून वेटींगवर पडलेले असते. एकूणच मुंबई - पुण्याहून येणारे व तिकडे जाणारेही प्रवासी मोठ्याप्रमाणात असतात.

 अशात नवरात्र व आश्विनी पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर अनेक भाविक तुळजापूरला तुळजाभवानीच्या दर्शनासाठी रेल्वेने येतात. तसेच दिवाळीच्या सुटीचे वेध लागल्यामुळे याच काळात पुणे, मुंबईला काम करणारे चाकरमाने गावाकडे परतत असतात. मात्र, या चारही रेल्वेच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्यामुळे या सर्वांचीच मोठी गैरसोय झाली आहे.

  

यामुळे करण्यात आले मेगाब्लॉकचे नियोजन

दौंड-कुडुवाडी विभागातील भाळवणी ते वाशिंबे रेल्वे स्थानकांच्या दरम्यानचे २६.३३ किलोमीटर दुहेरी लाइन सुरू करण्याची कामे करण्यात येणार आहेत. यामुळे रेल्वेने हा मेगाब्लॉक घोषित केला आहे. यामध्ये लोहमार्गाचे विघटन आणि स्थानांतरण करण्यात येईल. तसेच टर्नआउट स्लीपर घालणे, ट्रॅक सर्किटमध्ये बदल करणे, ड्रेलिंग स्विचची मर्यादा वाढवणे, नवीन क्रॉस ओव्हर घालणे अशी कामे योजली गेली आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी