मंचावर झालेल्या नाराजीनाट्यावर इम्तियाज जलील यांनी प्रतिक्रिया, शिरसाटांना दिला सबुरीचा सल्ला

always respect chandrakant khaire says imtiaz jaleel : चंद्रकांत खैरे हे माझे विरोधक जरी असले तरी मी त्यांचा नेहमीच आदर करतो. आम्ही त्या ठिकाणी  गणेशोत्सवाच्या समन्वयासाठी एकत्र आलो होतो. एका चांगल्या कार्यक्रमाचे नियोजन केले जात आहे. मी त्यांची समजूत काढली आणि त्यानंतर शिरसाट हे खाली बसले. पण त्या ठिकाणी हे सर्व घडणे हे दुर्दैवी असल्याचं देखील जलील यानी म्हटलं आहे.

always respect chandrakant khaire says imtiaz jaleel
'त्या' राजीनाट्यावर इम्तियाज जलील यांनी दिली प्रतिक्रिया  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • चंद्रकांत खैरे यांचा अगोदर सत्कार झाल्याने शिरसाट हे कमालीचे नाराज झाल्याचे पहायला मिळाले होते
  • चंद्रकांत खैरे हे ज्येष्ठ नेते आहेत, त्यांचा आदर केला पाहिजे – इम्तियाज जलील
  • संभाजी ब्रिगेड आणि शिवसेना एकत्र आले तरी त्याचे काहीही आश्चर्य वाटले नाही – इम्तियाज जलील

Imtiaz Jaleel On Chandrakant Khaire : औरंगाबाद : पोलीस आयुक्तालय औरंगाबाद यांच्या वतीने गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर समन्वय समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीत पहिल्यांदा चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांचा सत्कार केल्याने शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट (shinde group mla sanjay shirsat) हे नाराज होऊन थेट मंच सोडून निघून जात असल्याचे पाहायला मिळाले होते. दरम्यानं, शिरसाट जात असताना त्यांच्या हाताला पकडून इम्तियाज जलील ( Aurangabad MP imtiaz jaleel) यांनी पुन्हा खुर्चीवर बसवल्याचे पहायला मिळाले होते. सदर घटनेप्रकरणी खासदार इम्तियाज जलील यांनी पहिल्यांदाचं प्रतिक्रिया दिली आहे.

अधिक वाचा ; पहिल्या सामन्यात ठरला फेल, तरी T-20 मध्ये रोहित आहे अव्वल

चंद्रकांत खैरे हे ज्येष्ठ नेते आहेत, त्यांचा आदर केला पाहिजे – इम्तियाज जलील

चंद्रकांत खैरे यांचा अगोदर सत्कार झाल्याने शिरसाट हे कमालीचे नाराज झाल्याचे पहायला मिळाले होते. मात्र, चंद्रकांत खैरे हे ज्येष्ठ नेते आहेत, त्यांचा आदर केला पाहिजे, असा सल्लावजा चिमटा एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी संजय शिरसाट यांना लगावला आहे.  'चंद्रकांत खैरे हे जिल्ह्याचे खासदार राहिलेले आहेत. ते जिल्ह्यातील एक सीनियर लीडर आहेत, त्यांचा मान आदर करायलाच हवा असा सल्ला खासदार जलील यांनी आमदार संजय शिरसाट यांना दिला आहे.

अधिक वाचा : या बायकांपासून दूर राहण्यास सांगताय चाणक्य, जाणून घ्या कारण 

संभाजी ब्रिगेड आणि शिवसेना एकत्र आले तरी त्याचे काहीही आश्चर्य वाटले नाही – इम्तियाज जलील

दरम्यान, पुढे बोलताना जलील म्हणाले की, संभाजी ब्रिगेड आणि शिवसेना एकत्र आले तरी त्याचे काहीही आश्चर्य वाटले नाही. येणाऱ्या दिवसांमध्ये आणखीन काही असे नवनवीन समीकरण बघायला मिळाले तर आश्चर्य वाटायला नको असं देखील जलील यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर चंद्रकांत खैरे हे माझे विरोधक जरी असले तरी मी त्यांचा नेहमीच आदर करतो. आम्ही त्या ठिकाणी  गणेशोत्सवाच्या समन्वयासाठी एकत्र आलो होतो. एका चांगल्या कार्यक्रमाचे नियोजन केले जात आहे. मी त्यांची समजूत काढली आणि त्यानंतर शिरसाट हे खाली बसले. पण त्या ठिकाणी हे सर्व घडणे हे दुर्दैवी असल्याचं देखील जलील यानी म्हटलं आहे.

अधिक वाचा ; वजन कमी करताना चुकूनही Breakfast ला खाऊ नका 'या' गोष्टी

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी