नांदेड : राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेदरम्यानं काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते अशोक चव्हाण (Ashok Chavhan) आणि माजी मंत्री अमित देशमुख (Amit Deshmukh) या दोघांमध्ये मतभेद असून वाद निर्माण झाला असल्याच्या अनेक बातम्या समोर आल्या होत्या. माध्यमांमध्ये येत असलेल्या बातम्या चुकीच्या असून आपला आणि अमित देशमुख यांच्यात काही वाद नसून हे कपोलकल्पित आहेत असं स्पष्टीकरण अशोक चव्हाण यांनी दिले आहे. याविषयी अमित देशमुख यांनी या आधीच फेसबुकवर त्यांची भूमिका मांडली होती. ती मांडलेली भावना हीच वस्तुस्थिती असून, त्यांच्याशी पूर्णतः सहमत असल्याचं अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केलं आहे.
अधिक वाचा ; उद्धव ठाकरे कडाडले,कर्नाटकच्या CMचा ठाकरी शैलीत घेतला समाचार
दरम्यान, पुढे बोलताना अशोक चव्हाण यांनी म्हटलं की, भारत जोडो यात्रा अभूतपूर्व प्रतिसादाने महाराष्ट्रात यशस्वी झाली असून नांदेड आणि लातूरमध्ये निर्माण झालेले मतभेदाचे वृत्त निराधार आणि तथ्यहीन आहे असल्याचं अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केलं. भारत जोडो यात्रा तेलंगणातून महाराष्ट्रात नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथे आली असता तेथील स्वागताची जबाबदारी माझ्यावर तर नांदेडला लगत असलेल्या हिंगोली जिल्ह्यात यात्रेचे स्वागत करण्याची जबाबदारी लातूर जिल्ह्यावर होती. त्यामुळे नांदेडच्या कार्यक्रमाला देशमुख आले नाही. वास्तविक पाहता चव्हाण-देशमुख कुटुंबीयांचे संबंध हे अनेक दशकांपासूनचे आहेत. आणि ते कायम राहणार असल्याचं देखील चव्हाण यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर अशोक चव्हाण यांनी अमित देशमुख यांचे ट्वीट रिट्वीट करत आपली भूमिका मांडली आहे.
अधिक वाचा ; स्वत:हून राजीनामा द्या, मिळतील चांगले फायदे, अॅमेझॉनची ऑफर
राहुल गांधी यांची यात्रा नांदेडमध्ये आल्यानंतर या यात्रेमध्ये माजी मंत्री अमित देशमुख सहभागी झाले नव्हेत, त्यामुळे माध्यमांमध्ये अमित देशमुख आणि अशोक चव्हाण यांच्यात वाद असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. मात्र, हा वाद नसून आणि मतभेदाचे वृत्त निराधार आणि तथ्यहीन आहे. असं दोन्ही नेत्यांनी स्पष्ट केलं आहे.