Bharat Jodo Yatra भारत जोडो यात्रेसाठी भारतीय कुटुंब थेट लंडनहून आले

An Indian family has come straight from London for the Bharat Jodo Yatra ; भारत जोडो यात्रेत सहभागी झालेले कुटुंब हे मूळचे नाशिक जिल्ह्यातील महाडचे आहे.  डॉ. सुबोध कांबळे हे लंडनमध्ये स्थायिक आहेत. तेथे त्यांना नागरिकत्वही मिळालेले आहे. तरी देखील ते राहुल गांधी यांचे हात बळकट करण्यासाठी  ते या यात्रेत सहभागी होण्यासाठी भारतात आले आहेत. असं डॉ. सुबोध कांबळे यांनी म्हटलं आहे.

An Indian family has come straight from London for the Bharat Jodo Yatra
भारत जोडो यात्रेसाठी भारतीय कुटुंब थेट लंडनहून आले  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत सहभागी होण्यासाठी भारतीय वंशाचे कुटुंब लंडनहून आले
  • नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथून हे कुटुंब यात्रेत सहभागी झाले आहे
  • राहुल गांधी यांच्याबद्दल आदर आहे - डॉ. सुबोध कांबळे

हिंगोली : कॉंग्रेस नेते तथा खासदार राहुल गांधी यांची अनेक दिवसांपासून भारत जोडो यात्रा सुरु आहे. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेमुळे देशभरातील काँग्रेस पक्षाला सध्या चांगलीच ऊर्जा मिळत असताना पहायला मिळत आहे. ज्या राज्यात ही यात्रा जात आहे, त्या राज्यात भारत जोडो यात्रेला मोठा प्रतिसाद मिळताना पहायला मिळत आहे. सध्या राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा ही महाराष्ट्रात असून, महाराष्ट्रातील शिवसेनेसह, राष्ट्रवादीचे नेते देखील या यात्रेत सहभागी झाले होते. शिवसेनेचे नेते तथा आमदार आदित्य ठाकरे हे देखील भारत जोडो यात्रेत सहभागी झाले होते. दरम्यान, भारत जोडो यात्रेत सहभागी होण्यासाठी देशाच्या कोनाकोपऱ्यातून नागरिक येत आहेत. मात्र, या सगळ्यांमध्ये एक कुटुंब सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. एक भारतीय कुटुंब तर थेट लंडनहून आले असून मागील सहा दिवसांपासून ते भारत जोडो यात्रेत पायी चालत असल्याचे पहायला मिळत आहेत.\

अधिक वाचा ; राजन पाटलांची टीका करताना घसरली जीभ, चित्रा वाघ म्हणाल्या...

नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथून हे कुटुंब यात्रेत सहभागी झाले आहे

भारत जोडो यात्रेत सहभागी झालेले कुटुंब हे मूळचे नाशिक जिल्ह्यातील महाडचे आहे.  डॉ. सुबोध कांबळे हे लंडनमध्ये स्थायिक आहेत. तेथे त्यांना नागरिकत्वही मिळालेले आहे. तरी देखील ते राहुल गांधी यांचे हात बळकट करण्यासाठी  ते या यात्रेत सहभागी होण्यासाठी भारतात आले आहेत. त्यांच्यासमवेत पत्नी भारुलता पटेल-कांबळे, मुलगा प्रियम कांबळे,आरुष कांबळे हेही आहेत. नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथून ते यात्रेत सहभागी झाले असून, ते आज देखील राहुल गांधी यांच्या सोबत चालत असताना पहायला मिळत आहे.

अधिक वाचा ; थंडीत वजन कमी करण्यासाठी वापरा मेथीचे दाणे आणि पहा फरक 

राहुल गांधी यांच्याबद्दल आदर आहे - डॉ. सुबोध कांबळे

सदर कुटुंबाला पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना डॉ. सुबोध कांबळे म्हणाले, राहुल गांधी यांच्याबद्दल आदर आहे. मी देगलूर येथून या यात्रेत सहभागी झालो. महाराष्ट्रात ही यात्रा असेपर्यंत यात सहभागी होणार आहोत. भारुलता म्हणाल्या की,आमच्या भविष्यातील पिढीसाठी हा एक मोठा संदेश आहे. आम्ही विविधतेतून एकतेचा संदेश पाळला पाहिजे. अनेक भाषा, धर्म जाती आहेत. मात्र तरीही एकत्रित राहतो. आम्ही धर्म,जातीमध्ये विभागता कामा नये, असे त्यांनी म्हटले. पुढे बोलताना ते म्हणाले की. राहुल गांधीं बद्दल आम्हाला कुतुहलही आहे. सध्या देशात जे वातावरण आहे, ते पाहता राहुल गांधी यांचे जे देश जोडण्याचे प्रयत्न आहेत. त्यांना साथ देण्याचा हा मनापासूनचा प्रयत्न आहे. त्यांचा प्रयत्न खुप महत्त्वाचा आहे.इतरही अनेक मुद्दे आहेत,त्यासाठी त्यांना पाठिंबा द्यायचा असल्याने आम्ही भारत जोडो यात्रेत सहभागी झालो आहोत.

अधिक वाचा ; अरे देवा! आता Amazonमधील 3766 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी