Vinayak Mete: विनायक मेटेंसोबत घात की अपघात?, भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणाले...

Assault or Accident truth will come out Said Chandrasekhar Bawankule: विनायक मेटे यांच्यासोबत घात झाला की अपघात यामागचं सत्य लवकरच समोर येईल अशी प्रतिक्रिया चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे.

an investigation system set up for assault or accident truth will come out chandrasekhar bawankule bjp state president
Vinayak Mete: विनायक मेटेंसोबत घात की अपघात?, भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणाले... 
थोडं पण कामाचं
  • विनायक मेटेंच्या अपघाताची चौकशी होणार
  • भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी दिली माहिती
  • विनायक मेटेंच्या मृत्यूबाबत समर्थकांकडून व्यक्त केल्या जात आहेत शंका

Chandrasekhar Bawankule: मुंबई: शिवसंग्रामचे नेते आणि माजी आमदार विनायक मेटे (Vinayak Mete) यांच्या अपघाती निधनानंतर अनेकांनी त्यांच्या मृत्यूची (Death) चौकशी (Investigation) व्हावी अशी मागणी अनेकांनी केली आहे. विनायक मेटे यांच्या आईंनी तर आपल्या मुलासोबत घातपात झाला असावा असा थेट आरोपच केला आहे. दरम्यान या सगळ्याची उच्चस्तरीय चौकशी व्हावी अशी मागणी होऊ लागल्याने राज्य सरकारने या अपघाताबाबत तपास यंत्रणांना कामाला लावलं आहे. (an investigation system set up for assault or accident truth will come out chandrasekhar bawankule bjp state president)

'घात की अपघात यासाठी तपास यंत्रणा लावली आहे,  सत्य ते समोर येईल'
 
याबाबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांनी प्रतिक्रिया देताना असं म्हटलं की, 'मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी तपास यंत्रणा लावली आहे त्यातून सत्य ते बाहेर येईल. विनायकराव मेटे यांच्या कुटुंबाची ज्या काही मागण्या असतील त्या पूर्ण केल्या जातील. ते माझे अत्यंत जवळचे जिवाभावाचे मित्र होते.' 

अधिक वाचा: विनायक मेटेंच्या कारने धडक दिलेला ट्रक आणि चालक सापडला

'सामाजिक, भौगोलिक सर्व प्रश्नांची जाण असणारे ते नेते होते. अजूनही ते आमच्यात नाही या गोष्टीवर विश्वास बसत नाही.'अशी प्रतिक्रिया प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. 

 मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी विनायक मेटेंना दिला अखेरचा निरोप 

विनायक मेटे यांचं पार्थिव काल मुंबईवरून (Mumbai) बीडध्ये आणण्यात आलं होतं त्यानंतर ते बीड शहरातील शिवसंग्राम कार्यालयासमोर अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं. अंत्यदर्शन झाल्यानंतर विनायक मेटे यांची अंत्ययात्रा अण्णाभाऊ साठे चौक मार्गे जालना रोडकडून डीपी रोडवर असणाऱ्या विनायक मेटे यांच्या शेतात नेण्यात आली. इथेच  त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील उपस्थित होते.

अधिक वाचा: विनायक मेटेंच्या अपघातासाठी कारचालकाची डुलकी कारणीभूत असावी; अजित पवारांना शंका

विनायक मेटे यांच्यावर शासकीय इतमामात अत्यंसंस्कार पार पडले. यावेळी त्यांच्या कार्यकर्त्यांची आणि बीडमधील हजारो नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. मात्र, मुख्यमंत्री आणि इतर मंत्रिगण उपस्थित राहणार असल्याने या ठिकाणी अत्यंत चोख असा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

 

शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे मराठा आरक्षणाप्रश्नी बोलविण्यात आलेल्या बैठकीसाठी बीडहून मुंबईकडे निघाले होते. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील भातान बोगद्याजवळ प्रवास करत असताना त्यांच्या कारचा अपघात झाला यात मेटेंच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. रुग्णालयात पोहोचताच बरोबर त्यांना मृत घोषित करण्यात आले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी