'अन् शिवसेनेचा आमदार ढसाढसा रडला',पहा व्हिडीओ

And Shiv Sena MLA cried loudly, watch the video : “ज्यांनी-ज्यांनी शिवसेनेसोबत गद्दारी केली, त्यांच्यावर पुन्हा गुलाल उधळला नाही. म्हणून माझ्या सर्व बांधवांना विनंती आहे की, तुम्ही उद्धव ठाकरेंकडे या. साहेब शंभर टक्के तुम्हाला माफ केल्याशिवाय राहणार नाहीत." असं संतोष बांगर यांनी यावेळी म्हटलं आहे " मला आमचे गटनेते एकनाथ शिंदे यांनाही विनंती करायची आहे, तुम्ही सगळे एकत्र या. तुम्ही जो निर्णय घ्याल, त्यात आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत.

And Shiv Sena MLA cried loudly, watch the video
अन् शिवसेनेचा आमदार ढसाढसा रडला,पहा व्हिडीओ  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • शिवसेनेचे आमदार संतोष बांगर हे आज मोठमोठ्याने रडताना पहायला मिळाले आहे.
  • बांगर यांनी मात्र या घडामोडी घडत असताना त्यांनी मुंबई सोडली नव्हती.
  • बांगर यांनी मात्र या घडामोडी घडत असताना त्यांनी मुंबई सोडली नव्हती.

हिंगोली : शिवसेनेचे आमदार संतोष बांगर हे आज मोठमोठ्याने रडताना पहायला मिळाले आहे. ३ दिवसांपासून राज्यात सत्तेची मोठी उलथापालथ होताना दिसत आहे. शिवसेनेचे काही आमदार एकनाथ शिंदे यांच्या सोबत गुवाहाटी येथे निघून गेल्याने शिवसेनेची मोठी अडचण झाली असल्याचं पहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे काही आमदार हे उद्धव ठाकरे यांच्यासोबत अजूनही कायम असल्याचं पहायला मिळत आहे. यापैकी एक म्हणजे हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी मतदारसंघाचे आमदार संतोष बांगर हे देखील आहेत. बांगर यांनी मात्र शिवसेनेसोबतच राहणे पसंत केले आहे. बांगर यांनी मात्र या घडामोडी घडत असताना त्यांनी मुंबई सोडली नव्हती. आज ते त्यांच्या मतदारसंघात आले तेव्हा त्यांचे जंगी स्वागत देखील करण्यात आले. यावेळी बांगर यांना जनसमुदाय पाहून अक्षरशः रडू कोसळले. यावेळी त्यांनी शिंदे गटात सामील झालेल्या आमदारांना विनंती देखील केली आहे.

अधिक वाचा : या सुंदर जागी मलायकासोबत ३७ वा वाढदिवस साजरा करणार अर्जुन

माझ्या सर्व बांधवांना विनंती आहे की, तुम्ही उद्धव ठाकरेंकडे या  - संतोष बांगर

“ज्यांनी-ज्यांनी शिवसेनेसोबत गद्दारी केली, त्यांच्यावर पुन्हा गुलाल उधळला नाही. म्हणून माझ्या सर्व बांधवांना विनंती आहे की, तुम्ही उद्धव ठाकरेंकडे या. साहेब शंभर टक्के तुम्हाला माफ केल्याशिवाय राहणार नाहीत." असं संतोष बांगर यांनी यावेळी म्हटलं आहे " मला आमचे गटनेते एकनाथ शिंदे यांनाही विनंती करायची आहे, तुम्ही सगळे एकत्र या. तुम्ही जो निर्णय घ्याल, त्यात आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत. "छत्रपती शिवरायांचा जो भगवा बाळासाहेबांनी आपल्या खांद्यावर दिलाय, तो आबाद ठेवण्याचे काम सर्वांनी करावं. हीच कळकळीची विनंती तुम्हाला करतो. फक्त एकच काम करा, छत्रपतींच्या भगव्याला डाग लावू देऊ नका." असंही बांगर यांनी यावेळी म्हटलं आहे.

अधिक वाचा : 'राज्यातील घडामोडींशी भाजपचा संबंध नाही' 

माझ्यासारखा किराणा दुकान चालविणारा माणूस आज आमदार झाला, हेच शिवसेनेच मोठेपण – बांगर

दरम्यान, पुढे बोलताना बांगर म्हणाले की, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हा हळव्या मनाचा माणूस आहे. ते वर्षा बंगला सोडत होते, तर लोक रडताना मी पाहिले. त्यामुळे या संकटातून महाराष्ट्राला बाहेर काढण्याचे साकडे मी विठ्ठलाला घालत आहे", असेही ते म्हणाले. माझ्यासारखा किराणा दुकान चालविणारा माणूस आज आमदार झाला, हेच शिवसेनेच मोठेपण आहे. आमदार कुठेही गेले तर शिवसैनिक ठामपणे शिवसेनेच्या पाठीशी आहे. अंगावरचा भगवा हटला तर आम्ही काहीच नाही. कितीही ऑफर आल्या तरीही बळी पडणार नाही. "मी निवडून आल्यावर जेवढा सत्कार, सन्मान झाला नव्हता, तेवढा आज झाला. असंही बांगर म्हणाले.

अधिक वाचा : इंग्लंडविरुद्ध हार्दिक पांड्याच बनणार टीम इंडियाचा कर्णधार!

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी