Crime News : बीड : आपला नेता आपले कधी न कधी चांगलं करेल अशी अपेक्षा प्रत्येक कार्यकर्त्याला असते. मात्र, नेत्याने कार्यकर्त्याकडे लक्ष दिले नाही तर कार्यकर्ता संबंधित नेत्याला सोडून इतर पक्षात जातो हे आपण आजवर पहिले आहे. परंतु, बीडमध्ये काहीस वेगळा प्रकार घडला आहे. कार्यकर्ता असून नेत्याने दुर्लक्ष केले, अपमानस्पद वागणूक आणि लक्ष न दिल्यामुळे एका कार्यकर्त्याने चक्क सत्तूरने हल्ला केल्याची धक्कादायक घटना बीड जिल्ह्यात घडली आहे.
अधिक वाचा : सोन्यातील तेजी कायम, चांदीचा भावदेखील वधारला, पाहा ताजा भाव
तालुक्यातील चौसाळा येथील माजी आमदार स्व. चांदमल लोढा यांचे नातू व भीमाशंकर शुगर्सचे चेअरमन नितीन लोढा (३२) यांच्यावर हा हल्ला करण्यात आला असून, हल्ला करणारा व्यक्ती हा गावातीलच आहे. सदर हल्ल्यात नितीन लोढा हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर औरंगाबादेत खासगी दवाखान्यात उपचार सुरु आहेत. ही घटना ६ जून रोजी रात्री साडेदहा वाजता घडली. दरम्यान, हल्लेखोराला पोलिसांनी ताब्यात घेतले असून निषेधार्थ ७ जून रोजी कडकडीत बंद पाळण्यात आला आहे.
अधिक वाचा : मालिका सुरू होण्याआधीच थरथर कापू लागलाय आफ्रिकेचा कर्णधार!
सदर घटनेतील आरोपी तरुणाचे नाव रणजित गुंजाळ असं आहे. रणजीत गुंजाळ हा चौसाळा गावातीलच रहिवासी असून, त्याने नितीन लोढा यांच्यावर ६ जून रोजी हल्ला केला आहे. रणजीत गुंजाळ याने नितीन लोंढा यांना भेटण्यासाठी अनेक वेळा फोन केला, मात्र नितीन लोढा हे त्यांच्या नात्यातील एका लग्नसमारंभासाठी बाहेरगावी गेले होते. रात्री साडेनऊ वाजता लोढा कुटुंबीय घरी परतले. त्यानंतर, गुंजाळ याने रात्री साडेदहा वाजता गावातीलच रणजित गुंजाळ याने नितीन लोढा यांना फोन करुन भेटायचे असल्याचे सांगितले. त्यांनी सकाळी भेटू असे सांगितल्यावर मी घराकडे येत आहे, तात्काळ भेटायचे आहे, असे त्याने सांगितले. त्याला भेटण्यासाठी नितीन लोढा हे घराबाहेर येताच दुचाकीवरुन आलेल्या रणजित गुंजाळने सत्तूरने वार केला.
अधिक वाचा : ५ जूनपासून शनि चालतोय उलटी चाल, या लोकांची वाढणार डोकेदुखी
गुंजाळ याने लोढा यांच्यावर केलेल्या हल्ल्यात लोढा यांच्या चेहर्यावर जखम झाली आहे. त्यानंतर परिसरातील तरुणांनी त्यास पकडून चोप दिला. नेकनूर ठाण्याचे सहायक निरीक्षक मुस्तफा शेख, उपनिरीक्षक अजय पानपाटील व सहकाऱ्रूयांनी त्याला ताब्यात घेतले. हल्ल्यात वापरलेले शस्त्रही जप्त केले आहे.