संपत्तीच्या वादातून मुलाने घेतला वडिलांचा जीव 

औरंगाबाद
रोहित गोळे
Updated Jun 23, 2020 | 15:49 IST

Som killed father in Latur: संपत्तीसाठी मुलाने बापाची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. लातूर जिल्ह्यातील चाकूरमध्ये ही घटना घडली. 

Murder case
लातूरमध्ये हत्या   |  फोटो सौजन्य: Representative Image

थोडं पण कामाचं

  • संपत्तीसाठी मुलानेच केली वडिलांची हत्या
  • हत्येपूर्वी मुलगा आणि वडिलांमध्ये झाला होता बराच वाद
  • पोलिसांनी आरोपीला केली तात्काळ अटक

लातूर: लातूर जिल्ह्यातील (Latur) चाकूर येथे एका ५५ वर्षीय व्यक्तीची हत्या करणाऱ्या एका २८ वर्षीय व्यक्तीने आपल्या वडिलांची निर्घृण हत्या (Father Murder) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मृत व्यक्तीचं नाव चंद्रकांत मालपल्ले असं आहे. संपत्तीच्या वादातून  (Property dispute) ही हत्या केल्याचं समोर आलं आहे.  मुलाने केलेल्या जीवघेण्या हल्ल्यानंतर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना चंद्रकांत मालपल्ले यांचा मृत्यू झाला. 

चंद्रकांत हे माजी गाव सरपंच होते आणि त्याचे राजकीय संबंध होते. त्यांच्या दुसर्‍या मुलाने दिलेल्या तक्रारीच्या आधारे बीड पोलिसांनी आरोपीची ओळख पटवली आहे. पोलिसांनी आरोपी धनंजय मालपल्ले याच्यावर भारतीय दंड संहितेच्या (आयपीसी) कलम ३०२ अन्वये खुनाचा गुन्हा दाखल  केला आहे. याप्रकरणी धनंजयला पोलिसांनी अटकही केली आहे. 

पोलिसांनी धनंजयला अटक केल्यानंतर त्याची चौकशी करण्यात आली. यावेळी प्राथमिक तपासात पोलिसांना अशी माहिती मिळाली की, अटक केलेला आरोपी वडिलोपार्जित संपत्तीत आपला वाटा मागत होता. वडील आणि मुलगा यांच्यात अनेकदा या विषयावरुन वाद झाले होते. चंद्रकांत यांना आपल्या वडिलोपार्जित मालमत्तेचं समान वाटप करायाचं होतं. ज्यामध्ये त्यांच्या शेताचा देखील समावेश होता. पण मुलगा धनंजय शेती लगेच विकून टाकेल अशी त्यांना भीती वाटत होती. म्हणून, ते त्याला त्याचा वाटा देण्यास टाळाटाळ करीत होते.

दरम्यान, काल पुन्हा एकदा मुलगा आणि वडील यांच्यात जोरदार वाद झाला. यावेळी संतप्त धनंजयने वडील चंद्रकांत यांच्या डोक्यात मोठ्या फरशी मारली. ज्यामध्ये ते गंभीर जखमी झाले. त्याचवेळी इतर नातेवाईक हे तात्काळ घटनास्थळी पोहचले आणि त्यांना जवळच्या रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र, तिथून त्यांना एका खासगी रुग्णालयात पाठविण्यात आलं. जिथं उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.  

गावातील एका मोठ्या व्यक्तीचा अशाप्रकारे मृत्यू झाल्याने गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, याप्रकरणी आरोपीवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी