Kiran Gosavi in ​​trouble : किरण गोसावीला अडचणीत, 'एवढ्या' दिवसाची मिळाली पोलीस कोठडी

Aryan khan drugs case witness Kiran Gosavi in ​​trouble : किरण गोसावीने अनेक तरुणांना फसवले आहे. त्याचा तपास करायचा असल्याने किरण गोसावीची १० दिवसांची पोलीस कोठडी मिळावी अशी सरकारी वकिलांची मागणी केली होती

Kiran Gosavi in ​​trouble, got police custody
किरण गोसावीला अडचणीत, 'एवढ्या' दिवसाची मिळाली पोलीस कोठडी  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • किरण गोसावीला १० दिवसांची पोलीस कोठडी मिळावी सरकारी वकिलांनी केली होती मागणी
  • किरण गोसिवीची सेक्रेटरी शेरबानो कुरेशी हीच्या अकांउटमधे चिन्मय देशमुखने तीन लाख रुपये पाठवले होते
  • शेरबानो कुरेशीचे हे अकांउट किरण गोसावी बनावट कागदपत्रांच्या आधारे वापरत होता

Aryan khan drugs case witness Kiran Gosavi | पुणे :  गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असलेले मुंबई क्रूझ ड्रग्स प्रकरणात  (Mumbai Cruise Drugs Case) पंच असलेल्या किरण गोसावी याला पुणे पोलिसांनी अटक केली  आहे.  किरण गोसावी याला ८ दिवसाची पोलीस कोठडी मिळाली आहे.

 किरण गोसावी यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जाऊ लागली आहे. दरम्यान, सदर, प्रकरणात पंच असलेल्या प्रभाकर साईलच्या (Prabhakar Sail) आरोपांमुळे या प्रकरणाला वेगळं वळण मिळाले आहे. साईलने आपल्या एका व्हिडिओ (Video) मध्ये किरण गोसावीवरही आरोप केले होते, त्या आरोपानंतर गायब झालेल्या गोसावीला अखेर पुणे पोलिसांनी (Pune Police) ताब्यात घेतले आहे. पुणे पोलिसांनी दावा केला आहे की, किरण गोसावीने (Kiran Gosavi) सरेंडर केलेलं नसून आम्ही आमच्या इंटलिजेंसच्या आधारे त्याला अटक केली असल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे.

किरण गोसावीला १० दिवसांची पोलीस कोठडी मिळावी सरकारी वकिलांनी केली होती मागणी

किरण गोसावीने अनेक तरुणांना फसवले आहे. त्याचा तपास करायचा असल्याने किरण गोसावीची १० दिवसांची पोलीस कोठडी मिळावी अशी सरकारी वकिलांची मागणी केली होती. मात्र, न्यायालयाने किरण गोसावीला आठ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्याली आहे. किरण गोसावी याच्याविरोधात ठाणे, कळवा, अंधेरी, पालघर अशा अनेक पोलीस ठाण्यात गुन्हे नोंद आहेत.

 

किरण गोसावीची सेक्रेटरी शेरबानो कुरेशीचा सहभाग

किरण गोसावी याच्यावर चिन्मय देशमुख या तरुणाने गंभीर आरोप केले आहेत. किरण गोसावीने अनेक तरुणांना फसवले आहे. यामधे अनेकांची मोठी आर्थिक फसवणूक झाली असल्याचं देखील चिन्मय देशमुख या तरुणाने म्हटलं आहे. किरण गोसावीची सेक्रेटरी शेरबानो कुरेशी हीच्या अकांउटमधे चिन्मय देशमुखने तीन लाख रुपये पाठवले होते. मात्र, शेरबानो कुरेशीचे हे अकांउट किरण गोसावी बनावट कागदपत्रांच्या आधारे वापरत होता. पैसै परत मागितल्यावर त्याने चिन्मय देशमुखला धमकी दिली आणि शिवीगाळ केली असल्याचं देखील आरोप केला जाऊ लागला आहे. किरण गोसावी विरोधात २०१८ मधे गुन्ह्याची नोंद आहे. त्याच्याविरोधात एप्रिल २०१९  मधे चार्जशीट पाठवण्यात आली होती. त्यामुळे अनेक तरुणांच्या झालेल्या फसवणुकीचा  तपास करायचा असल्याने किरण गोसावीची १० दिवसांची पोलीस कोठडी मिळावी अशी सरकारी वकिलांनी मागणी केली होती. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी