बंडखोर आमदारांचा मतदारसंघात पोहचताच बदलला सूर, आधी उध्दव ठाकरे अन् आता संजय राऊत जबाबदार

शिवसेनेच्या बंडखोर आमदार आपल्या मतदार संघात परतत आहेत. औरंगाबादचे आमदार संजय शिरसाट आज आपल्या मतदारसंघात परतले. त्यानंतर, त्यांनी आपल्या बंडाचं कारण आणि राजकारण दोन्हीही सांगितले.

As soon as the rebel MLAs reached the constituency, the tone changed, first Uddhav Thackeray and now Sanjay Raut are responsible.
बंडखोर आमदारांचा मतदारसंघात पोहचताच बदलला सूर, आधी उध्दव ठाकरे अन् आता संजय राऊत जबाबदार   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • आमदार संजय शिरसाट यांनी औरंगाबाद विमानतळावर चाहत्यांनी मोठी गर्दी केली
  • बंड शिवसेना वाचविण्यासाठी होता
  • संजय राऊत यांच्या समाचार घेतला

औरंगाबाद : शिवसेनेच्या बंडखोर आमदारांनी भाजपसोबत हातमिळवणी करुन सत्ता स्थापन केल्यानंतर बंडखोर आमदार संजय शिरसाट आज औरंगाबाद शहरात पोहचले.  आपआपल्या मतदारसंघात पोहचले. यावेळी त्यांच्या कार्यकर्त्यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले. त्यांची औरंगाबाद विमानतळ ते कोकणवाडी अशी वाहन रॅली काढली. दरम्यान, त्यांनी माध्यमांशी संवाद झाला. दोन आठवड्यापूर्वी शिवसेनेतील बंडखोरीचे कारण देत असताना उद्धव ठाकरे आमदारांना भेटत नाही, शरद पवारांच्या सूचनेनुसार वागतात, असे सांगणाऱ्या शिरसाटांनी आज खासदार संजय राऊत आणि सुभाष देसाईंवर टिका केली. (As soon as the rebel MLAs reached the constituency, the tone changed, first Uddhav Thackeray and now Sanjay Raut are responsible.)

अधिक वाचा : Thane Ghodbunder Road Accident : ठाण्यातील घोडबंदर येथे खड्ड्यामुळे दुचाकीस्वाराचा मृत्यू, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिकाऱ्य़ांना झापले

दोन आठवड्यापूर्वी शिवसेनेच्या आमदारांनी उध्दव ठाकरे यांच्याविरोधात बंड पुकारून महाराष्ट्रात राजकीय खळबळ माजली असताना शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेले पत्र चर्चेत आले आहे. संभाजीनगर (पश्चिम) म्हणजेच औरंगाबाद येथील शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी उद्धव यांना लिहिलेल्या पत्रात बंडखोरीची कारणे अधोरेखित केली आहेत. पत्राच्या भाषेवरून असे दिसते की, शिवसेनेतील बंडखोरीचे सर्वात मोठे कारण म्हणजे उद्धव यांची त्यांच्या आमदारांना उपलब्ध नसणे, पवारांच्या सूचनेनुसार वागणे हे आहे.

अधिक वाचा : VIDEO: आयुष्यात माझ्याकडून झालं मोठं पाप, शिवसेना खासदाराला 'या' गोष्टीचा होताय पश्चाताप

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर बंडखोर आमदार एकनाथ शिंदे विराजमान झाल्यानंतर बंडखोर आमदार दोन आठवड्यानंतर आपआपल्या मतदारसंघात पोहचले. शिवसेनेचे बंडखोर आमदार संजय शिरसाट हे आज औरंगाबाद शहरात परत आले आहे. यावेळी मतदारसंघात त्यांच्या समर्थकांकडून त्यांचे स्वागत करण्यात आले. शिवसेनेसोबत बंडखोरी केल्यानंतर संजय शिरसाट हे मोठ्या प्रमाणात प्रकाशात आले होते यानंतर त्यांच्या विरोधात औरंगाबाद जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नाराजी दिसून आली होती काही शिवसैनिकांनी त्यांच्या पोस्टरला काळीही फासले होते.

अधिक वाचा : मोठी बातमी! शिवसेनेनंतर आता काँग्रेस-राष्ट्रवादीला बंडाची कीड लागणार; मोठं खिंडार पडणार, 'या' आमदाराने केला दावा

आमदार संजय शिरसाट यांनी परिषद घेऊन माध्यमांशी बोलताना संजय शिरसाट म्हणाले की, संजय राऊत हे शिवसेना संपवायला निघाले आहे. मातोश्रीची दारे बंद केले तर यांना श्वास घेणे मुश्किल होईल. काय गरज होती भावना गवळी यांना पदावरून काढण्याची हेच चालू आहे. त्यामुळे शिवसैनिक नाराज आहे. आज ईडी त्यांच्या मागे लागली म्हणून तुम्ही पद काढून घेतले त्यामुळेच सर्व आमदार नाराज आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी