Crime News अल्पवयीन तरुणी बोलत नसल्याने तरुणाने केले धक्कादायक कृत्य

As the minor girl was not talking, the young man beat her ; मैत्रिणीचा वाढदिवस साजरा करत असताना एका तरुणाने एका अल्पवयीन मुलीला मारहाण केली असल्याचाधक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना शहरातील वसमत रोडवर शिवशक्ती बिल्डिंग जवळ घडली आहे.

As the minor girl was not talking, the young man beat her
अल्पवयीन तरुणी बोलत नसल्याने तरुणाने केले धक्कादायक कृत्य   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • एका तरुणाने एका अल्पवयीन मुलीला मारहाण केली
  • परभणीमधील वसमत शहरात घडली धक्कादायक घटना
  • आरोपी तरुणाविरोधात पोलिसात गुन्हा दाखल

परभणी : महिलांचा तसेच अल्पवयीन मुलींचा सुरक्षेचा प्रश्न राज्यात ऐरणीवर आला आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, परभणी जिल्ह्यातील वसमत शहरात अशीचं एक धक्कादायक घटना घडली आहे. मैत्रिणीचा वाढदिवस साजरा करत असताना एका तरुणाने एका अल्पवयीन मुलीला मारहाण केली असल्याचाधक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना शहरातील वसमत रोडवर शिवशक्ती बिल्डिंग जवळ घडली आहे. याप्रकरणी अल्पवयीन मुलीने दिलेल्या तक्रारीवरून आरोपी विरोधात नवा मोंढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अविष्कार लोखंडे असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे.

अधिक वाचा ; घर खरेदी करतांय? मग या गोष्टींची घ्या काळजी, नाहीतर पश्चाताप

"तू माझ्याशी बोलत का नाहीस", असे म्हणत मुलीला मारहाण केली

परभणी शहरातील सारनाथ कॉलनी येथे राहणारी १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी शहरातील शारदा महाविद्यालय येथे पदवीचे शिक्षण घेत आहे. सदरील मुलगी आपल्या मैत्रिणीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी वसमत रोडवरील शिवशक्ती बिल्डिंग जवळ गेली होती. यावेळी तेथे उपस्थित असलेल्या अविष्कारने वाढदिवस साजरा करत असताना पिडीत तरुणीजवळ आला आणि खाली ठेवलेला केक अल्पवयीन मुलीच्या मैत्रिणीच्या तोंडाला लावला. त्यानंतर त्याने वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि अल्पवयीन मुलीचा हात पकडून "तू माझ्याशी बोलत का नाहीस", असे म्हणत मुलीला मारहाण केली. सदर घडलेल्या प्रकारानंतर मुलीने सदर प्रकार हा आपल्या नातेवाईकांना संगीतला. त्यानंतर मुलीने नवा मोंढा पोलिस ठाणे गाठून अविष्कार विरोधात तक्रार दिली. पोलिसांनी अविष्कार लोखंडे यांच्या विरोधात पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक पौळ करत आहेत.

अधिक वाचा ; उद्धव ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी शिंदे गटाच्या वाटेवर 

अल्पवयीन मुलीच्या मैत्रिणीला देखील गाडीवर बसून नेत केली माराहणं

अविष्कार हा पिडीत मुलीच्या घराशेजारीच राहतो अशी माहिती समोर आली आहे. दरम्यान, तो पिडीतेच काही दिवसांपासून पाठलाग देखील करत होता. अविष्कारने पिडीत मुलीच्या मैत्रिणीचा वाढदिवस साजरा करताना पिडीतेला मारहाण तर केलीच मात्र त्याने अल्पवयीन मुलीच्या मैत्रिणीला देखील गाडीवर बसून केंद्रीय महाविद्यालयाजवळ घेऊन गेला आणि त्या ठिकाणी मुलीच्या मैत्रिणीला देखील मारहाण केली असल्याची माहिती समोर आली आहे.

अधिक वाचा ; नशीब चमकावायचे आहे का? मग घरात 'या' दिशेला लावा घड्याळ

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी