Ashok Chavan "विधानपरिषदेच्या निवडणुकीत काँग्रेस नेते चंद्रकांत हंडोरेंच्या पराभवाला अशोक चव्हाण जबाबदार", अशोक चव्हाणांवर गंभीर आरोप

"Ashok Chavan responsible for Chandrakant Handore's defeat" : विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसने पहिल्या पसंतीचा क्रम चंद्रकांत हंडोरे यांना दिला होता. म्हणजे हंडोरे यांचा या निवडणुकीतील विजय निश्चित मानला जात होता. मात्र आमदारांनी पक्षादेश पाळला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याचबरोबर, पहिल्या फेरीअखेरीस काँग्रेसचे दोन्ही उमेदवार चंद्रकांत हंडोरे आणि भाई जगताप यांच्यापैकी एकालाही ४६ मतांचा कोटा पूर्ण करता आला नव्हता. तसेच दुसऱ्या पसंतीची मतेही हंडोरे यांना मिळाली नाहीत.

"चंद्रकांत हंडोरेंच्या पराभवाला अशोक चव्हाण जबाबदार"  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • भीमशक्ती संघटनेचे सरचिटणीस मोहन माने यांनी केले कॉंग्रेसचे जेष्ठ नेते अशोक चव्हाण यांच्यावर गंभीर आरोप
  • हंडोरे यांच्या पराभवाला अशोक चव्हाण आणि त्यांचे नांदेडमधले सहकारी आमदार जबाबदार - भीमशक्ती संघटना
  • चंद्रकांत हंडोरे आणि भाई जगताप यांच्यापैकी एकालाही ४६ मतांचा कोटा पूर्ण करता आला नव्हता

नांदेड :  भीमशक्ती संघटनेचे सरचिटणीस मोहन माने यांनी कॉंग्रेसचे जेष्ठ नेते अशोक चव्हाण यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. विधानपरिषदेच्या निवडणुकीत काँग्रेस नेते चंद्रकांत हंडोरे (Chandrakant Handore) यांच्या पराभवाला अशोक चव्हाण जबाबदार असल्याचं खळबळजनक वक्तव्य मोहन यांनी केलं आहे. मोहन माने यांनी केलेल्या या वक्तव्यानंतर राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान, भीम शक्ती संघटनेने चव्हाणांना नेस्तनाबूत करण्याचा संकल्प केला असल्याचा इशारा मोहन माने यांनी दिला आहे.

अधिक वाचा : पंकजा मुंडेंना मंत्रिपद नाही ते नाही, परिषदही नाही?

हंडोरे यांच्या पराभवाला अशोक चव्हाण आणि त्यांचे नांदेडमधले सहकारी आमदार जबाबदार - भीमशक्ती संघटना

दरम्यान, पुढे बोलताना भीमशक्ती संघटनेच्या नेत्यांनी हंडोरे यांच्या पराभवाला अशोक चव्हाण आणि त्यांचे नांदेडमधले सहकारी आमदार जबाबदार असल्याची घणाघाती टीका संघटनेने केली आहे. नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथे भीमशक्ती संघटनेचा एक मेळावा घेण्यात आला होता. या मेळाव्यात भीमशक्ती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी हंडोरे यांच्या पराभवाचे विश्लेषण करत चव्हाण आणि त्यांचे सहकारी आमदार यांच्यावर घणाघाती टीका केली आहे.  दरम्यान, पक्षादेश झुगारून मतदान केलेल्यांवर मी नाराज आहे, त्यांच्यावर कारवाई झाली नाही, तर निर्णय घेऊ, असा इशारा देखील हंडोरे यांनी स्वकीयांना दिला होता. मात्र, अद्याप यावर कोणत्याही नेत्यावर कारवाई करण्यात आली नसल्याचे दिसून येत आहे.

अधिक वाचा : स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर कधीच हातपाय बघत नाही : गुलाबराव

चंद्रकांत हंडोरे आणि भाई जगताप यांच्यापैकी एकालाही ४६ मतांचा कोटा पूर्ण करता आला नव्हता

 विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसने पहिल्या पसंतीचा क्रम चंद्रकांत हंडोरे यांना दिला होता. म्हणजे हंडोरे यांचा या निवडणुकीतील विजय निश्चित मानला जात होता. मात्र आमदारांनी पक्षादेश पाळला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याचबरोबर, पहिल्या फेरीअखेरीस काँग्रेसचे दोन्ही उमेदवार चंद्रकांत हंडोरे आणि भाई जगताप यांच्यापैकी एकालाही ४६ मतांचा कोटा पूर्ण करता आला नव्हता. तसेच दुसऱ्या पसंतीची मतेही हंडोरे यांना मिळाली नाहीत.

अधिक वाचा ; अमित शहांचा मुंबई दौरा, लालबागच्या राजाचे घेणार दर्शन 

२०१९ च्या विधानसभेच्या निवडणुकीत झाला होता हंडोरे यांचा पराभव

चंद्रकांत हंडोरे हे २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या तिकिटावर विधानसभेच्या रिंगणात उतरले होते, मात्र शिवसेनेच्या प्रकाश फातर्पेकर यांनी हंडोरे यांचा  पराभव केला. चंद्रकांत हंडोरे हे मुंबईतील चेंबुर विधानसभा मतदारसंघातील माजी आमदार आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या काळात त्यांनी सामाजिक न्याय मंत्री म्हणून धुरा सांभाळली होती. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे ते उपाध्यक्ष देखील आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी