भोळसर महिलेवर अत्याचार, पोलिसांनी बुटावरून शोधला आरोपी, पोलिसांचे होतंय कौतुक

Atrocities on a mad woman in Aurangabad : भोळसर महिला एकटी असल्याचा फायदा घेत थेट शिऊर बंगला ते शिऊर रस्त्यावरील नवीन मंदिराच्या पाठीमागे घेऊन गेला. त्यांनतर तिथे असलेल्या मोकळ्या जागेवर नेऊन पिडीत महिलेवर बळजबरीने अत्याचार केला. सदर महिलेवरील अत्याच्याराची घटना रविवारी रात्रीच्या सुमारास घडली आहे.

Atrocities on a mad woman in Aurangabad
भोळसर महिलेवर अत्याचार, पोलिसांनी बुटावरून शोधला आरोपी,  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • भोळसर असल्याचा फायदा घेत एका नराधमाने महिलेवर अत्याचार केला
  • आरोपीने मोकळ्या जागेवर नेऊन पिडीत महिलेवर बळजबरीने अत्याचार केला
  • बुटाच्या आधारे पोलिसांनी पटवली आरोपीची ओळख

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. भोळसर असल्याचा फायदा घेत एका नराधमाने महिलेवर अत्याचार केला असल्याची घटना घडली आहे. वैजापूर तालुक्यातील शिऊर बंगला परिसरात सदर घटना घडली आहे. महिलेवर अत्याचार करणाऱ्या आरोपीचे नाव प्रेमसिंग भन्साराम मैवाळ असं आहे. प्रेमसिंग भन्साराम मैवाळ हा राहणार तरबाची वाडी, तालुका वैजापुर, जिल्हा औरंगाबाद येथील आहे. प्रेमसिंगला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्यावर शिऊर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल देखील नोंदवण्यात आला आहे.

अधिक वाचा ; लाल चंदनामुळे साडेसातीमध्येही दिलासा मिळण्याची शक्यता

आरोपीने मोकळ्या जागेवर नेऊन पिडीत महिलेवर बळजबरीने अत्याचार केला

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सदर पिडीत महिला ही भोळसर आहे. याचाच फायदा नराधमाने घेतला. सदर पिडीत महिला वैजापूर तालुक्यातील एका गावातील आहे. भोळसर असल्याकारणाने ती महिला शिऊर बंगला परिसरात एकटीच फिरत होती. यावेळी नराधम आरोपी हा त्या ठिकाणी आला आणि त्याने भोळसर महिला एकटी असल्याचा फायदा घेत थेट शिऊर बंगला ते शिऊर रस्त्यावरील नवीन मंदिराच्या पाठीमागे घेऊन गेला. त्यांनतर तिथे असलेल्या मोकळ्या जागेवर नेऊन पिडीत महिलेवर बळजबरीने अत्याचार केला. सदर महिलेवरील अत्याच्याराची घटना रविवारी रात्रीच्या सुमारास घडली आहे. सकाळी महिलेने घडलेला सर्व प्रकार आपल्या भावाला सांगितला. त्यांनतर दुसऱ्या दिवशी घटना उघडकीस आली. 

अधिक वाचा : सावधान! आता सर्व कागदपत्रे असतानाही कापले जाणार 2000 चे चलान 

बुटाच्या आधारे पोलिसांनी पटवली आरोपीची ओळख

आपल्या बहिणीवर अत्याचार झाला असल्याचं कळताच भावाने तत्काळ पोलीस ठाणे गाठले आणि पोलिसात फिर्याद दिली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत तात्काळ घटनास्थळी धाव घेत घटनेचा पंचनामा केला. यावेळी पोलीस पथकाला घटनास्थळी आरोपीचा एक बूट सापडला. त्यांनतर पोलिसांनी पिडीत महिलेची देखील विचारपूस करून काही महिती घेतली. त्यानुसार पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. सोबतच श्वान पथकास बोलावून बुटाच्या आधारे आरोपीची ओळख पटवली आहे. त्यांनतर पोलिसांनी आरोपी प्रेमसिंगला ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्यानुसार त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका भोळसर महिलेवर अत्याचाराच्या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली होती.

अधिक वाचा : एकाच कुटुंबातील 9 जणांनी विष प्राशन करून सामूहिक आत्महत्या

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी