Aditya Thackeray यांच्या गाडीवर हल्ला ; औरंगाबादमध्ये नेमकं काय झालं?

Aditya Thackeray DJ Clash :शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या औरंगाबाद दौऱ्यादरम्यान, त्यांच्या गाड्यांच्या ताफ्यावर दगडफेकीची घटना घडली. त्यामुळे रात्री महालगाव परिसरात तणावाचे वातावारण होते.

Attack on Aditya Thackeray's car; Stone pelting on convoy in Aurangabad
Aditya Thackeray यांच्या गाडीवर हल्ला ; औरंगाबादमध्ये ताफ्यावर दगडफेक ।   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • औरंगाबाद जिल्ह्यातील महालगावमध्ये आदित्य ठाकरे यांच्या गाडीवर हल्ला
  • सभेस्थळावर DJ च्या आवाजावरुन वाद झाला.
  • शिंदे गटातील आमदार रेमश बोरनारे यांच्या मतदारसंघात घटना

औरंगाबाद : शिवसेना नेते आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्या शिवसंवाद यात्रेचा सातवा टप्पा सुरु आहे. मंगळवारी ते औरंगाबाद जिल्ह्यातील महालगावात त्यांचा सभा होते. दरम्यान, त्याच्या गाडीच्या ताफ्यावर दगडफेकीची घटना घडली. त्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. (Attack on Aditya Thackeray's car; Stone pelting on convoy in Aurangabad)

अधिक वाचा :  घरच्यांकडून कुटुंबातील बेपत्ता सदस्यावर अंत्यसंस्कार; नंतर सोशल मीडियातून मृत व्यक्ती प्रकटला, असं कसं घडलं ? पडला प्रश्न
शिवसेना आमदार आदित्य ठाकरे हे सध्या औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. आदित्य ठाकरे महालगावात पोहोचल्यावर त्यांचा ठाकरे गटाच्या नेत्यांकडून जोरदार स्वागत करण्यात आले. परंतु सभा सुरू होण्याच्या दरम्यान रमाईंची मिरवणूक सुरु झाली होती. सभास्थळी स्टेजच्या पाठीमागून मिरवणूक जात असताना dj चा आवाज कमी करायला लावल्याने वाद झाला.

अधिक वाचा :  BMC Recruitment 2023: मुंबई मनपात नोकरीची संधी; आजच करा अर्ज, जाणून घ्या कोणत्या पदासाठी आणि कसा करायचा अर्ज

सभेमध्ये शिवसेना नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे यांचे भाषण सुरु असताना अज्ञात व्यक्तीने स्टेजवर दगड भिरकावला. त्यामुळं यावेळी गोंधळाचे वातावरण निर्माण झालं होतं. मात्र, खैरे यांनी आपले भाषण चालूच ठेवेले. त्यानंतर सभा संपल्यावर पुन्हा एकदा आदित्य यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न करण्यात आला. तर काही जणांनी आदित्य ठाकरे यांच्या ताफ्यावर दगडफेक केल्याचेही समोर आले आहे. त्याशिवाय काही लोकांनी पपईचे तुकडे त्यांच्या गाडीच्या ताफ्यावर फेकल्याचं समोर आले आहे. यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. 

अधिक वाचा :  Daily Horoscope : आजचे राशीभविष्य, जाणून घ्या आपले बुधवार 8 फेब्रुवारी 2023चे भविष्य

दरम्यान, आदित्य ठाकरे यांच्या गाडीवर झालेला हल्ला हा शिंदे गटातील आमदारांच्या कार्यकर्त्यांनी केला असल्याचा आरोप विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी केला आहे. भीमशक्ती आणि शिवशक्ती एकत्र येणार आहे, त्यामुळं काही लोकांनी जाणीवपूर्वक एकत्र येऊ नये म्हणून हे कारस्थान केल्याचे दानवे म्हणाले. आदित्य ठाकरे यांच्या सुरक्षेत सरकारकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जात आहे. सरकारने त्यांची सुरक्षा वाढवावी अशी मागणी दानवे यांनी केली.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी