औरंगाबादेत कोरोना बाधितांचा आकडा वाढला, एकूण संख्या झाली 'इतकी'

औरंगाबाद
अजहर शेख
Updated Jun 18, 2020 | 15:25 IST

औरंगाबाद जिल्ह्यात कोरोना बाधितांचा आकडा पुन्हा वाढण्यास सुरुवात झाली आहे.काही दिवसापूर्वी औरंगाबाद जिल्ह्याला थोडाफार दिलासा मिळला होता.मात्र आता बाधितांची संख्या वाढत चालल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झालेय.

aurangabad 70 new corona patient found
औरंगाबादेत कोरोनाबाधितांचा आकडा पुन्हा वाढला, एकूण संख्या ३ हजाराच्या पुढे  

थोडं पण कामाचं

  • औरंगाबाद जिल्ह्यात गुरुवारी पुन्हा ७० कोरोना बाधित रुग्णांची भर
  • एकूण कोरोना बाधित रुग्णांचा आकडा ३१०६ वर पोहोचला आहे
  • १२२४ रुग्णांवर वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरू

औरंगाबाद: पश्चिम महाराष्ट्रानंतर मराठवाड्यात देखील कोरोनाने (Corona) आपले हातपाय पसरायला चांगलीच सुरुवात केली आहे. मराठवाड्यात (Marathwada) कोरोना बाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला असून, रुग्णांच्या संख्येसोबतच मृतकांचा आकडाही वाढत आहे. बुधवारी औरंगाबादेत चार जणांचा बळी गेला आहे. दरम्यान औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्यात गुरुवारी पुन्हा ७० कोरोना बाधित रुग्णांची भर पडली असून एकूण कोरोना बाधित रुग्णांचा आकडा ३१०६ वर जाऊन पोहोचला आहे. दरम्यान यापैकी १७१६ कोरोना बाधित रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी गेले आहेत. तर १६६ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने आता १२२४ रुग्णांवर वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे प्रशासनाने कळविले आहे.

या परिसरातील आढळले नवीन बाधित रुग्ण

शिवाजी नगर, गारखेडा १, एन बारा, हडको १, कैसर कॉलनी २, चिकलठाणा १, नंदनवन कॉलनी २,मिसारवाडी १, नूतन कॉलनी २, गांधी नगर १, मुकुंदवाडी १, हर्सूल मध्यवर्ती कारागृह निवास परिसर १, नागेश्वरवाडी १, श्रीराम नगर १, रामेश्वर नगर १, न्यू विशाल नगर १, आझाद चौक ३,  घाटी रुग्णालय परिसर १, नॅशनल कॉलनी १, सिंधी कॉलनी १, पहाडसिंगपुरा १, न्यू हनुमान नगर १, पडेगाव १, लक्ष्मी कॉलनी २, हर्सुल, जटवाडा १, म्हसोबा नगर, मयूर पार्क १, खोकडपुरा ३, जय भवानी नगर, गल्ली नं. चार २,

एन आठ सिडको २, एन नऊ,सिडको २, महू नगर १, गजानन नगर, गल्ली नं.नऊ, गारखेडा १, पुंडलिक नगर १, स्वामी विवेकानंद नगर १, हरीकृष्ण नगर, बीड बायपास १, श्रीविहान कॉलनी १, शक्ती अपार्टमेंट १, गणेश कॉलनी २, एमजीएम हॉस्पीटल परिसर १, जाधववाडी, नवीन मोंढा १, साई नगर, सिडको १, टीव्ही सेंटर १, सावित्री नगर, चिकलठाणा १, पुंडलिक नगर १, स्वामी विवेकानंद नगर १, हरीकृष्ण नगर, बीड बायपास १, श्रीविहान कॉलनी १, शक्ती अपार्टमेंट १, गणेश कॉलनी २, एमजीएम हॉस्पीटल परिसर १, जाधववाडी, नवीन मोंढा १, साई नगर, सिडको १, टीव्ही सेंटर १, सावित्री नगर, चिकलठाणा १,  बन्सीलाल नगर १, औरंगपुरा १, सुभाषचंद्र नगर, एन अकरा १, जय भवानी नगर, गल्ली नं. एक १, रामदेव नगर १, बजाज नगर २, सावरकर कॉलनी, बजाज नगर १, त्रिमूर्ती चौक, बजाज नगर १, इंदिरा नगर, पंढरपूर २, जय भवानी चौक, बजाज नगर ५, सिडको महानगर दोन १ या भागातील कोरोनाबाधित आहेत. यामध्ये ३१ स्त्री व ३९ पुरूष रुग्णांचा समावेश आहे.

मराठवाड्याच्या या जिल्ह्यात रुग्ण संख्या वाढतेय

सध्या मराठवाड्याच्या औरंगाबाद, जालना, नांदेड, उस्मानाबाद आणि लातूर या जिल्ह्यांमध्ये कोरोना बाधितांचा आकडा वाढत आहे. बुधवारी नांदेड जिल्ह्यात रुग्ण वाढीला ब्रेक लागला आहे. मात्र जालना आणि औरंगाबादमध्ये रुग्ण वाढ सुरूच आहे. औरंगाबाद जिल्ह्यात तब्बल आज पुन्हा नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर चौघांचा बळी गेला आहे. तर जालना जिल्ह्यात नवे २३ रुग्ण आढळून आले असून एकाचा मृत्यू झाला. या मृत्यूमुळे जालना जिल्ह्यातील मृतांची संख्या आता ९ झाली आहे.

लातुरात ३ नवीन रुग्ण

दरम्यान लातूर जिल्ह्यामध्ये देखील कोरोनाचे ३ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे लातूर जिल्ह्यामध्ये  बाधितांची संख्या २११ इतकी झाली आहे. लातूर यातील एक रुग्ण लातूर शहरातील भोई गल्ली येथील असून उर्वरीत दोन रुग्ण ग्रामीण भागातील आहेत, दरम्यान, लातूर येथील दोन रुग्णांना बुधवारी घरी सोडण्यात आले. यातील ६८ वर्षीय महिला रुग्णाला उच्च रक्तदाब व दमा हा आजार होता तसेच त्यांना न्यूमोनिया झाला होता.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी