औरंगाबाद सामूहिक आत्महत्या प्रकरणाला वेगळे वळण?, मुलाने केला मोठा खुलासा

औरंगाबाद
अजहर शेख
Updated Aug 07, 2020 | 19:58 IST

Aurangabad mass suicide case : समीना आणि रुस्तुम यांचा आंतरजातीय प्रेम विवाह झाला होता. रुस्तुम हा बांधकाम व्यावसायिक असल्याने त्यांची घरची देखील परस्थिती अत्यंत चांगली

Aurangabad A different twist to the mass suicide case of the same family?
औरंगाबाद एकाच कुटुंबातील सामूहिक आत्महत्या प्रकरणाला वेगळे वळण?  |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

  • कोरोनाने झाला होता पतीचा मृत्यू
  • पोलिसांनी सुरु केली चौकशी
  • समीना आणि रुस्तुमचा आंतरजातीय प्रेम विवाह

औरंगाबाद: देशासह राज्यात कोरोनाचे (corona) रुग्ण देवसेंदिवस वाढत चालले आहेत. दरम्यान देशासह राज्यात कोरोनाने अनेकांना आपला प्राण (corona death)देखील गमवावा लागला आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी सुरक्षित समजला जाणारा मराठवाड्यात देखील कोरोनाने आता चांगलेच थैमान घातले आहे. औरंगाबादेत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची (aurangabad corona positive patient) संख्या १५ हजाराच्या वर जाऊन पोहोचली आहे. कोरोनाच्या वाढत्या सख्येमुळे औरंगाबाद जिल्ह्यातील लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान कोरोनाच्या पार्श्वभूमीवर औरंगाबादेत एक घटना समोर आली आहे. पतीच्या मृत्यू नंतर घरातील सदस्यांनी देखील आत्महत्या केली असून यामध्ये पत्नीचा आणि मुलीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. यातून मुलाचा जीव वाचला असून, त्याने धक्कादायक खुलासा केला आहे.

कोरोनाने झाला होता पतीचा मृत्यू

दरम्यान रुस्तुम शेख यांचा कोरोनाने मृत्यू (corona death) झाला आहे. रुस्तुम शेख यांच्या कुटुंबात पत्नी समीना आणि दोन जुळी मुलं यामध्ये मुलगा समीर आणि एक मुलगी आयेशा असा एकंदरीत परिवार होता. मात्र त्यांच्या परिवाराला कोरोनामुळे ग्रहण लागलं आणि कुटुंबप्रमुख असणाऱ्या रुस्तुम शेख यांचा मृत्यू झाला. कुटुंब प्रमुख गेल्या नंतर आपण राहून काय करायचं हा विचार करून कुटुंबातील सदस्यांनी देखील आत्महत्या (aurngabad family sucide) केली. यामध्ये रुस्तुम शेख यांच्या पत्नी आणि मुलीचा मृत्यू झाला अशी प्राथमिक माहिती समोर आली होती. मात्र या घटनेत आता नवीन माहिती समोर आली आहे. वाचलेल्या मुलाने आत्म्हत्येबद्द्ल नवीन खुलासा केला आहे मुलाने केलेल्या या खुलास्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

काय केला मुलाने खुलासा?

दरम्यान कुटुंबाने केलेल्या सामूहिक आत्महत्येत पत्नी आणि मुलगी यांचा मृत्यू झाला असून, मुलगा समीर वाचला आहे. समीरने पोलिसांना दिलेल्या जवाबात मोठा खुलासा केला आहे. सामिनाने अगोदर मुलगी आयेशाची गळा दाबून हत्या केली आणि नंतर स्वतः गळफास घेतला. दरम्यान सामिनाने गळफास घ्यायच्या अगोदर माझ्या हाताच्या नसा कापण्यास सांगितले. त्याप्रमाणे मी नसा कापून घेतल्या आणि स्वतःच्या गळ्यावर देखील ब्लेड मारून घेतल्या असं समीरचं म्हणणं असल्याची माहिती समीरच्या नातेवाईकांनी दिली असल्याचं वृत्त समोर येत आहे.

समीना आणि रुस्तुमचा आंतरजातीय प्रेम विवाह

दरम्यान पुढे देखील एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. समीना आणि रुस्तुम यांचा आंतरजातीय प्रेम विवाह झाला होता. रुस्तुम हा बांधकाम व्यावसायिक असल्याने त्यांची घरची देखील परस्थिती अत्यंत चांगली होती. त्यामुळे आर्थिक तंगीमुळे आत्महत्या केली असल्याची शंका येत असून, सदर प्रकरण दुसऱ्या वळणावर जाण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

पोलिसांनी सुरु केली कसून चौकशी

दरम्यान पोलीस आता या घटनेच्या मुळापर्यंत जाण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांनी बचावलेल्या समीरची आता कसून चौकशी देखील सुरु केली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी