AURANGABAD | अब्दुल सत्तरांच्या घरावर दगडफेक करणाऱ्यांची धरपकड, फडणवीसांनी दिला सरकारमधील मंत्र्यांना समज

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल वापरलेल्या गलिच्छ भाषेच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांनी कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या घरावर दगडफेक केली. त्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी कार्यकर्त्यांना अटक केली असून याचा बारकाईने तपास करत कारवाई करण्यात येईल असे पोलीस उपायुक्त अपर्णा गिते यांनी सांगितले आहे

AURANGABAD | Arrest of those who threw stones at Abdul Sattar's house
AURANGABAD | अब्दुल सत्तरांच्या घरावर दगडफेक करणाऱ्यांची धरपकड, फडणवीसांनी दिला सरकारमधील मंत्र्यांना समज  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • कृषीमंत्री अब्दुल सत्तारांनी सुप्रिया सुळेंनी केली शिवीगाळ
  • सत्तारांच्या वक्तव्याच्या निषेधात राष्ट्रावादी रस्त्यावर
  • दगडफेक आणि घोषणाबाजी केल्याप्रकरणी २२ जणांवर गुन्हा

औरंगाबाद : राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांना कृषीमंत्री अब्दुल सत्तारगलिच्छ शब्दात शिवीगाळ केल्याने राष्ट्रवादीने आक्रमक भूमिका घेतली. वक्तव्याच्या निषेध म्हणून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सत्तारांच्या निवासस्थानावर दगडफेक केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी सोमवारी रात्री बेगमपुरा पोलिस ठाण्यात २२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता, त्यापैकी अनेकांनी आज पोलिसांनी धरपकड केली. दुसरीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारमधील मंत्र्यांना समज दिला. (AURANGABAD | Arrest of those who threw stones at Abdul Sattar's house)

अधिक वाचा : एकनाथ शिंदे 50 आमदारांना खोके देताहेत पण... रामदास कदम बोलले..

राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांच्यावर आक्षेपार्ह वक्तव्यामुळे राज्यातील राजकारण तापले आहे. त्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी अनेक शहरांमध्ये निदर्शने केली. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, अब्दुल सत्तार यांच्या औरंगाबाद आणि मुंबईतील घरांवर दगडफेक करण्यात आली, तर त्यांचे मूळ गाव सिल्लोड आणि पुणे, ठाणे, औरंगाबाद, जालना, नागपूर आणि पंढरपूरमध्ये त्यांच्याविरोधात निदर्शने करण्यात आली.याप्रकरणी औरंगाबाद पोलिसांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करुन कार्यकर्त्यांना अटक करण्यास सुरूवात केली आहे. 

अधिक वाचा : Aurangabad । सांगा कसं करायचं अन् कसं जगायचं? आदित्य ठाकरेंसमोर शेतकऱ्यांच्या अश्रूंचा बांध फुटला

दुसरीकडे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, अब्दुल सत्तार जे बोलले त्याचे मी समर्थन करणार नाही. हे पूर्णपणे चुकीचे आहे. पण त्याचवेळी 'खोके' वरुन चिडवणे अत्यंत चुकीचे आहे. हे देखील समजून घेतले पाहिजे. दोन्ही बाजूंनी आचारसंहिता पाळणे अत्यंत आवश्यक आहे. अब्दुल सत्तार यांच्या या वक्तव्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र शब्दात निषेध केला आहे. यासोबतच त्यांनी विरोधकांना भाषेचा सन्मान राखण्याचा सल्लाही दिला आहे.

महिलांबाबत कोणीही अपशब्द वापरू नये. आमचा विरोध असेल. ते जसे आपल्याला लागू होते तसेच ते विरोधकांनाही लागू होते. राजकारणात ही आचारसंहिता पाळली पाहिजे, असे मला वाटते. दोन्ही बाजूंनी आचारसंहिता पाळली पाहिजे, असे ते म्हणाले. मला वाटतं या पातळीचं राजकारण महाराष्ट्रात होऊ नये, असे आवाहन फडणवीस यांनी केले. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी