औरंगाबादमधील धक्कादायक घटना; कोविड सेंटरमध्ये डॉक्टराकडून महिलेचा विनयभंग

Aurangabad Covid-19 care center: औरंगाबादमधील कोविड सेंटरमध्ये एक धक्कादायक घटना घडल्याचं समोर आलं आहे. एका कोविड बाधित महिलेकडे डॉक्टराने शारीरिक सुखाची मागणी केली आहे. या घटनेचे एकच खळबळ उडाली आहे.

Molestation
प्रातिनिधीक फोटो (फोटो सौजन्य: iStockimages) 

थोडं पण कामाचं

  • महाराष्ट्रातील महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर
  • औरंगाबादमधील कोविड सेंटरमध्ये महिलेचा विनयभंग

औरंगाबाद : महाराष्ट्रात महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. उस्मानाबाद येथे पोलीस कर्मचाऱ्याने महिलेवर बलात्कार केल्याचा प्रकार समोर आल्यानंतर आता औरंगाबादमधील कोविड सेंटरमध्ये डॉक्टरने एका महिलेचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कोविड सेंटरमध्ये उपचारासाठी आलेल्या महिलेकडे डॉक्टरने शारीरिक सुखाची मागणी केली. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

कोविड सेंटरमध्ये डॉक्टरने शारीरिक सुखाची मागणी केल्याचं वृत्त पसरताच पीडित महिलेच्या नातेवाईकांनी आरोपी डॉक्टरला मारहाण केली. या घटनेनंतर औरंगाबाद मनपाच्या आरोग्य अधिकारी नीता पडळकर यांनी आरोपी डॉक्टरला निलंबित केलं आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील पदमपुरा येथे दोन दिवसांपूर्वी कोरोना बाधित महिला उपचारासाठी कोविड सेंटरमध्ये दाखल झाली होती. यानंतर कोविड सेंटरमध्ये उपचार करणाऱ्या डॉक्टरने या महिलेचा नंबर घेतला आणि त्यानंतर तिला वारंवार फोन करुन शारीरिक संबंध ठेवण्याची मागणी करु लागला. 

पीडित महिलेने मंगळवारी सांगितले, रात्री २ वाजता डॉक्टरने महिलेकडे शारीरिक संबंधाची मागणी केली. तसेच डॉक्टरने जबरदस्ती छतावर घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्या डॉक्टरला विरोध केला आणि आरडा-ओरड केला. या घटनेनंतर संपूर्ण कोविड सेंटरमध्ये एकच गदारोळ उडाला.

प्राथमिक चौकशीनंतर संबंधित डॉक्टरला बडतर्फ

औरंगाबाद महानगरपालिका हद्दीतील दवाखान्यात एका महिलेवर डॉक्टरने विनयभंग केल्याची घटना गंभीर आहे. या घटनेचे कोणीही समर्थन करणार नाही. त्या महिलेवर बलात्कार झालेला नाही. प्राथमिक चौकशीनंतर संबंधित डॉक्टरला बडतर्फ करण्यात आले आहे अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत दिली.

३१ मार्चपर्यंत एसओपी जाहीर करण्यात येणार

तसेच वरिष्ठांकडून या घटनेची सखोल चौकशी केली जाईल. या महिलेचे नाव बाहेर न येता लवकरच संपूर्ण घटनेचा आढावा घेऊन संबंधित आरोपीवर कठोर कारवाई करण्यात येईल. तसेच सर्व ठिकाणी ३१ मार्चपर्यंत एसओपी जाहीर करण्यात येणार असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी