इतके पैसे कुठून आणले रिक्षावाला असणाऱ्या दाढीने? चंद्रकांत खैरेंची आदित्य ठाकरेंसमोरचं एकनाथ शिदेंवर सडकून टीका, पुढे म्हणाले...

aurangabad ex mp chandrakant khaire on maharashtra chief minister eknath shinde : आदित्य ठाकरे यांच्या औरंगाबाद येथील सभेमध्ये बोलताना चंद्रकांत खैरे यांनी राज्याचे मुख्यमंत्री यांच्यबद्दल सवाल उपस्थित केला आहे. “एका रिक्षावाल्याकडे एवढे कोट्यवधी रुपये कुठून आले?” असा प्रश्न खैरे यांनी जाहीर सभेमध्ये उपस्थित एकनाथ शिंदे यांच्यावर सवाल उपस्थित करत टीका केली आहे. पुढे बोलताना, खरे म्हणाले की, “आपण आता ज्या मार्गाने आलात त्यावर किती लोक थांबले होते हे आपण पाहिलं असेल.

aurangabad ex mp chandrakant khaire on maharashtra chief minister eknath shinde
एका रिक्षावाल्याकडे कोट्यवधी रुपये कुठून आले?  
थोडं पण कामाचं
  • सभेमध्ये शिवसेनेचे नेते तथा माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर सडकून टीका केली
  • आमच्या एक एका कार्यकर्त्यांमागे ईडी लावता, मग त्यांच्या मागे का लावत नाही – खैरे
  • इतके पैसे कुठून आणले रिक्षावाला असणाऱ्या दाढीने?

औरंगाबाद ; एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेसोबत बंड करत दुसरा गट स्थापन केला आहे. या गटात शिंदे यांनी आपल्यासोबत शिवसेनेचे तब्बल ४० आमदार घेऊन गेले आहेत. शिंदे यांनी वेगळा गट केल्यापासून शिवसेनेत मोठ्या प्रमणात गळती सुरु आहे. दरम्यान, हीच गळती थांबवण्यासाठी आणि शिवसेनेला नवसंजीवनी देण्यासाठी आदित्य ठाकरे हे मैदानात उतरले असल्याचे पहायला मिळता आहे. शिवसेना नेते आदित्य ठाकरे हे सध्या बंडखोर आमदारांच्या मतदारसंघात मेळावे, सभा तसेच शिवसैनिकांच्या भेटीगाठी  घेत आहेत. काल आदित्य ठाकरे यांची औरंगाबाद येथे सभा होती. या सभेमध्ये शिवसेनेचे नेते तथा माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर सडकून टीका केली आहे.

अधिक वाचा : हे घरगुती उपाय पावसाळ्यातील त्वचेच्या समस्यांवर देतील आराम

नेमकं काय म्हणाले चंद्रकांत खैरे?

आदित्य ठाकरे यांच्या औरंगाबाद येथील सभेमध्ये बोलताना चंद्रकांत खैरे यांनी राज्याचे मुख्यमंत्री यांच्यबद्दल सवाल उपस्थित केला आहे. “एका रिक्षावाल्याकडे एवढे कोट्यवधी रुपये कुठून आले?” असा प्रश्न खैरे यांनी जाहीर सभेमध्ये उपस्थित एकनाथ शिंदे यांच्यावर सवाल उपस्थित करत टीका केली आहे. पुढे बोलताना, खरे म्हणाले की, “आपण आता ज्या मार्गाने आलात त्यावर किती लोक थांबले होते हे आपण पाहिलं असेल. असं आदित्य ठाकरे यांना म्हणत म्हणाले की, ठाकरे बाहेर पडले की लगेच वलय निर्माण होतं,” असंही खैरे म्हणाले.

अधिक वाचा ; राजद्रोहाची शिक्षा झाली त्यातले बहुतांश लेखन नव्हते टिळकांचे

आमच्या एक एका कार्यकर्त्यांमागे ईडी लावता, मग त्यांच्या मागे का लावत नाही – खैरे

खैरे पुढे बोलताना म्हणाले, आमच्या एक एका कार्यकर्त्यांमागे ईडी लावता तुम्ही तर यांच्या पाठीमागे का नाही? “मला एक आश्चर्य वाटतं १९८८ च्या नंतर एक रिक्षावाला एवढे कोट्यवधी रुपये कसे जमा करु शकतो?”, त्यांच्या पाठीमागे ईडी का नाही. असा प्रश्न उपस्थित करत खैरे यांनी मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केलं. “इथे जे जमले आहेत ते ठाकरे परिवाराची जनता आहे. ही जनता फक्त ठाकरे कुटुंबाला मानते. असंही खैरे म्हणाले.

अधिक वाचा ; जेव्हा जिनांनी घेतले होते लोकमान्य टिळकांचे वकीलपत 

इतके पैसे कुठून आणले रिक्षावाला असणाऱ्या दाढीने?

आनंद दिघे साहेबांच्या आशिर्वादाखाली तू मोठा झाला आणि आनंद दिघेंना विसरुन गेला. त्यांच्या चित्रपटात दाखवलंय ना गद्दारांना क्षमा नाही. काही लपणार नाही. मुंबई ठाण्याच्या लोकांना कळू लागलंय,” असंही खैरे म्हणाले. “५०-५० खोके दिले (बंडखोर आमदारांना). किती खर्च केले? इतके पैसे कुठून आणले रिक्षावाला असणाऱ्या दाढीने? किती लुटले?” असे प्रश्नही खैरे यांनी विचारले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी