वडिलांना लग्नाचा पेलत नव्हता खर्च, दोन वेळा मोडले लग्न, शेतकर्‍याच्या मुलीची चिट्ठी लिहून आत्महत्या

औरंगाबाद
अजहर शेख
Updated Feb 25, 2021 | 17:44 IST

farmer daughter sucide in district : वैशालीच्या घराची परस्थिती हलाखीची होती. त्यामुळे वैशालीच्या वडिलांना तिच्या लग्नाचा खर्च पेलत नसल्याचे तिला माहिती होते.  लग्नखर्च पेलत नसल्यामुळे तीचे दोन वेळा लग्न मोडले

farmer daughter sucide in district
लग्न मोडले, शेतकर्‍याच्या मुलीची चिट्ठी लिहून आत्महत्या  |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

  • लग्नखर्च पेलत नसल्यामुळे दोन वेळा लग्नही मोडले
  • घरातील पाईपला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली
  • मृत्युपूर्वी वैशालीला औरंगाबाद शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले होते.

औरंगाबाद : आपल्या वडिलांवर कर्जाचे ओझे नको असा विचार करून, एका शेतकऱ्याच्या मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी आणि धक्कादायक घटना औरंगाबाद जिल्ह्यात (aurangabad district) घडली आहे. वैशाली राधाकिशन जाधव, (vaishali radhakishan jadhav) असं आत्महत्या (sucide) केलेल्या शेतकऱ्याच्या मुलीचे (farmer daughter) नाव आहे. दरम्यान, लग्नखर्चाच्या धास्तीने सदर मुलीने आपले जीवन संपविले असून, औरंगाबाद जिल्ह्यातील लाडगाव (ladagav) या गावात ही घटना घडली आहे. वैशाली हिच्या आत्महत्येनंतर संपूर्ण गावत शोककळा पसरली असून, कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे.

लग्नखर्च पेलत नसल्यामुळे दोन वेळा लग्नही मोडले

वैशालीच्या घराची परस्थिती ही अत्यंत हलाखीची होती. त्यामुळे वैशालीच्या वडिलांना तिच्या लग्नाचा खर्च पेलत नसल्याचे तिला माहिती होते. लग्नखर्च पेलत नसल्यामुळे तीचे दोन वेळा लग्न देखील मोडले असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे आपल्या लग्नासाठी वडिलांवर कर्जाचा डोंगर नको, म्हणून वैशालीने आत्महत्या केली असल्याची माहिती आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये तिने लिहून ठेवली आहे.

घरातील पाईपला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली

दरम्यान वैशालीने आपल्या घरातीलच पाईपला ओढणीने गळफास घेऊन आपले जीवन संपविले आहे. बुधवारी २४ फेब्रुवारी रोजी पहाटे चार वाजेच्या दरम्यान ही घटना घडली आहे.

वैशालीला औरंगाबाद शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले 

दरम्यान करमाड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लाडगाव येथील एका तरुणीने तिच्या राहत्या घरी ओढणीच्या सहाय्याने गळफास बुधवार पहाटे चार वाजता गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार, ते आत्महत्या केलेल्या घटनास्थळी तत्काळ दाखल झाले. त्यांनी वैशालीला खाली उतरवून औरंगाबाद शासकीय रुग्णालयात उपचारासाठी हलविले. मात्र, तिथे डॉक्टरांनी वैशालीला तपासून मृत घोषित केले.

आत्महत्येपूर्वी वैशालीने चिट्ठीत काय लिहिले होते?

दरम्यान, वैशालीने आत्महत्येपूर्वी एक चिट्ठी लिहून ठेवली होती. त्यात तिने “माझ्या वडिलांची परिस्थिती अंत्यत गरीब असल्याचे म्हटले होते. पुढे तिने चिट्ठीत लिहिले आहे की, माझे दोन वेळेस जुळलेलं लग्न मोडून गेले. त्यामुळे माझ्या गरीब वडिलांना यांचा मनस्ताप सहन करावा लागला. पुढे माझे लग्न करायचे तर कर्ज काढून वडिलांना करावे लागणार होते. त्यामुळे मी माझे जीवन संपवित आहे”, असे वैशालीने चिट्ठीत लिहून आपलं जीवन संपवलं. 

करमाड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद

दरम्यान पोलिसांनी या प्रकरणी करमाड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. गरिबीमुळे एका मुलीला आत्म्हत्या करण्याची वेळ आल्याने संपूर्ण गावात शोककळा पसरली असून, तिच्या कुटुंबीयावर दुखाचे डोंगर कोसळले आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी