Aurangabad News : बैलगाडी शर्यतीत औरंगाबादेत राडा, पोलिसांनी केला लाठीचार्ज

rada from bullock cart race in aurangabad mild police lathi charge : परवानगी नसल्याने पोलिसांनी आयोजकांना शंकरपट बंद करण्याचे आवाहन केले. यावेळी आयोजक आणि पोलिसात शाब्दिक चकमक झाली. आयोजक व पोलिसांत सुरु असलेली शाब्दिक चकमक बऱ्याच वेळ चालली होती. त्यातच बघेपण जाण्यास तयार नव्हते. त्यामुळे परस्थितीचे गांभीर्य पाहून पोलिसांनी अधिकची कुमक मागवून घेतली.

rada from bullock cart race in aurangabad mild police lathi charge
औरंगाबादेत राडा, लिसांनी केला लाठीचार्ज,वाचा काय घडली घटना?  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • पळशी शिवारात शनिवारी शंकरपट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते
  • मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश येथील स्पर्धक देखील सहभागी झाले होते
  • आयोजक, पोलिसांत सुरु असलेली शाब्दिक चकमक बऱ्याच वेळ चालली यांनतर पोलिसांनी केला लाठीचार्ज

औरंगाबाद  : औरंगाबाद शहरालगत (Aurangabad City) असलेल्या पळशी शिवारात शनिवारी बैलगाडा शर्यत स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सचिन पळसकर यांनी आत्माराम पळसकर यांच्या वाढदिवसानिमित्त शंकरपटाचे आयोजन केले होते. परंतु बैलगाडा शर्यत आयोजनासाठी पोलिसांची रीतसर परवानगी घेतली नव्हती अशी माहिती समोर आली आल्यानंतर पोलिसांनी हस्तक्षेप करत हा सामना थांबवला. पोलिसांनी सामना थांबवला म्हणून आयोजक आणि पोलिसांमध्ये तणाव निर्माण झाला होता. यानंतर पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करत हा सामना अखेर थांबवावा लागला आहे. शंकरपट स्पर्धेत सहभागी होण्यासाठी शहर जवळपासच्या खेड्यांतील मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते. यासाठी 1 हजार ते 21 हजारापर्यंत बक्षीस ठेवण्यात आले होते. (aurangabad fight between two group over bullock cart race police lathi charge)

अधिक वाचा ; महिला आपल्याच मुलाच्या मुलीची झाली आई, नातीला दिला जन्म

मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश येथील स्पर्धक देखील सहभागी झाले होते

सचिन पळसकर यांनी आत्माराम पळसकर यांच्या वाढदिवसानिमित्त पळशी परिसरात नियमबाह्य बैलगाडा शर्यत स्पर्धा भरवल्या होत्या. चिकलठाणा ग्रामीण पोलिसांना या घटनेची माहिती गुप्त खबऱ्याद्वारे मिळाली आणि त्यांनी घटनास्थळी धाव घेत, आयोजकांकडे परवानगीबाबत विचारणा केली. पोलिसांनी आयोजकांकडे परवानगी आहे का? असे विचारले यानंतर आयोजकांनी परवानगी नसल्याने पोलिसांनी पोलिसांना संगीतले. परवानगी नसल्याने पोलिसांनी स्पर्धा थांबवल्या. त्यामुळे आयोजक आणि पोलिसात हुज्जत सुरु झाली. दरम्यान परस्थितीचे गांभीर्य पाहता पोलिसांनी स्पर्धक व बैलगाडा शर्यत बघण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांना सौम्य लाठीचार्ज करत तेथून हुसकावून लावले. 

अधिक वाचा : IND Vs ZIM: उपांत्य फेरीसाठी आज भारत- इिम्बाब्वे आमने-सामने

आयोजक, पोलिसांत सुरु असलेली शाब्दिक चकमक बऱ्याच वेळ चालली यांनतर पोलिसांनी केला लाठीचार्ज

परवानगी नसल्याने पोलिसांनी आयोजकांना बैलगाडा शर्यत बंद करण्याचे आवाहन केले. यावेळी आयोजक आणि पोलिसात शाब्दिक चकमक झाली. आयोजक व पोलिसांत सुरु असलेली शाब्दिक चकमक बऱ्याच वेळ चालली होती. त्यातच बघेपण जाण्यास तयार नव्हते. त्यामुळे परस्थितीचे गांभीर्य पाहून पोलिसांनी अधिकची कुमक मागवून घेतली. त्यानंतर पुन्हा आवाहन केलं, मात्र फरक पडत नसल्याने पोलिसांनी सौम्य लाठीमार सुरु केला. यानंतर तेथे उपस्थित असलेली गर्दी पूर्णपणे पांगली.

अधिक वाचा : पूजेच्या घरात चुकूनही ठेवू नका 'या' 6 गोष्टी, आजच काढून टाका 

चिखलठाणा पोलिसांनी सहा ते सात आयोजकांवर गुन्हा दाखल केला

शंकरपटाच्या स्पर्धा भरवण्याबाबतची बंदी न्यायालयाने उठवली आहे. तरीदेखील, देखील यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातून रीतसर परवानगी घ्यावी लागते. मात्र पळशी येथे आयोजित करण्यात आलेल्या बैलगाडा शर्यत स्पर्धेसाठी परवनागी घेण्यात आली नव्हती. त्यामुळे चिखलठाणा पोलिसांनी सहा ते सात आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी