aurangabad kalmanuri bus accident in jintur : जिंतूर : महाराष्ट्रातल्या परभणी जिल्ह्यातील जिंतूरमध्ये राज्य परिवहनच्या औरंगाबाद कळमनुरी बसने पार्क केलेल्या १० दुचाकी आणि २ कारना धडक दिली.
भोवळ आल्यामुळे बस चालक दादाराव संभाजी धनवे यांनी वाहनावरचे नियंत्रण गमावले. यानंतर बस रस्त्यावरून कडेला उभ्या असलेल्या (पार्क केलेल्या) वाहनांच्या दिशेने गेली. काही वाहनांना धडक देऊन अखेर बस एका झाडाला धडकली. या अपघातात कोणीही जखमी झालेले नाही. पण बसचे तसेच पार्क केलेल्या वाहनांचे नुकसान झाले.
बस चालक दादाराव संभाजी धनवे यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. वेळेत उपचार मिळाल्यामुळे त्यांची प्रकृती स्थिर आहे.
अपघात शुक्रवार १५ एप्रिल २०२२ रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास जिंतूरच्या टी पॉइंट परिसरात झाला. नियमानुसार बस वाहक कुंडलिक बोलवे यांनी राज्य परिवहनच्या अधिकाऱ्यांना अपघाताची माहिती दिली. बसमधील सर्व प्रवाशांना पर्यायी बसने पुढील प्रवासाकरिता नेण्यात आले. ज्या बसला अपघात झाला ती डागडुजीसाठी डेपोमध्ये नेण्यात आली.ॉ