औरंगाबाद : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ५४ व्या वाढदिवसानिमित्त औरंगाबादच्या मनसे एका शाखेने ५४ रुपये लिटर दराने पेट्रोल देण्याचा निर्णय घेतला आहे. या उपक्रमाला नागरिकांनी प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. ५४ रुपये लीटर पेट्रोल घेण्यासाठी सुमारे ३ किलोमीटरची रांग लागल्याचे चित्र दिसत आहे.
राज ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्ताने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आज बुधवार 14 जून रोजी औरंगाबाद शहरातील क्रांती चौकात 54 रुपये लिटर प्रमाणे पेट्रोलची विक्री करण्यात आली. राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्ताने नागरिकांसाठी अनोखी योजना राबवली.
पेट्रोल खरेदी करण्यासाठी नागरिकांच्या तीन किलोमीटरपर्यंत रांग लागली होती. एकीकडे पेट्रोलचे दर 120 रुपये लिटर पेक्षा जास्त असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने राज ठाकरे यांच्या 54 वाढदिवसानिमित्ताने 54 रुपये लिटर प्रमाणे पेट्रोलची विक्री करण्यात आली आहे. यासाठी औरंगाबाद शहरातील क्रांती चौक परिसरातील पेट्रोल पंपावर ती व्यवस्था करण्यात आली होती.
या ठिकाणी पेट्रोल खरेदी करण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचे चित्र आज रोजी दिसून आले आहे. यासंदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष सुमित खांबेकर यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी सांगितले की लोकांना आधार मिळावा या हेतूने राज ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्ताने 54 रुपये लिटरने आज रोजी आम्ही पेट्रोलची विक्री करत असून हा सर्वसाधारण नागरिकांना राज ठाकरे यांच्याकडून वाढदिवसाचे गिफ्ट आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना एक दिवसासाठी 54 रुपये लिटरने पेट्रोल देऊ शकते तर राज्य शासन का नाही असाही सवाल यावेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष सुमित खांबेकर यांनी राज्य शासनाला हा सवाल केला आहे.