VIDEO: औरंगाबाद महापालिकेत मनसेचा राडा, उपायुक्तांच्या डोक्यात खुर्ची घालण्याचा प्रयत्न

MNS leader threaten municipal corporation commissioner: औरंगाबाद शहरात कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. याविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी मनपात जोरदार राडा घातला आहे.

MNS leader threaten deputy commissioner of corporation
औरंगाबाद मनपात मनसेचा राडा 

थोडं पण कामाचं

  • औरंगाबादमध्ये कोरोना बाधितांची संख्या आणखी वाढली 
  • कोरोना बाधितांची वाढती संख्या पाहून मनसे आक्रमक 
  • मनसे पदाधिकाऱ्यांचा महापालिकेत जोरदार राडा 

औरंगाबाद : शहरात कोरोना (Corona) रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असताना महापालिकेचे अधिकारी, डॉक्टर मात्र एसी दालनात बसून आहेत कोरोनामुळे गेलेल्या बळींना जबाबदार कोण? असा जाब विचारत मनसेने (MNS) आंदोलन केले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष सुहास दाशरथे (Suhas Dashrathe) यांनी औरंगाबाद महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रवींद्र निकम (Ravindra Kadam) यांच्या डोक्यात शुक्रवारी (२६ जून) दुपारी खुर्ची घालण्याचा प्रयत्न करत एकच राडा घातला.

औरंगाबाद शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे आणि या गोष्टीला महापालिका प्रशासनाने अवलंबलेली पद्धत जबाबदार आहे असा आरोप करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शिष्टमंडळाने महापालिकेवर कुंभकर्णाची वेशभूषा करत आंदोलन केले. दरम्यान मनसेच्या शिष्टमंडळाची अतिरिक्त आयुक्त रविंद्र निकम यांच्यासोबत चर्चा सुरू असताना झालेल्या शाब्दिक चकमकीनंतर मनसे जिल्हाध्यक्ष सुहास दाशरथे यांनी हातात खुर्ची घेऊन ती निकम यांच्या डोक्यात घालण्याचा प्रयत्न केला. यावेळी उपस्थित पोलीस कर्मचारी यांनी मनसे जिल्हाध्यक्षानां धरत त्यांना केबीन बाहेर नेले. 

यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष सुहास दशरथ यांनी महापालिका प्रशासनावर गंभीर आरोप केले आहे. महापालिका प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याने औरंगाबाद शहरात कोरोनां रुग्णांची संख्या वाढत आहे. तसेच बीडसह अन्य जिल्ह्यातून दररोज हजारो प्रवासी ये-जा करत आहेत. याला महापालिका प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप मनसे जिल्हाध्यक्ष यांनी केला असून महापालिका प्रशासनाने यामध्ये गांभीर्य दाखविले नाही तर यापुढे उग्र आंदोलन करण्याचा इशारा देखील यावेळी मनसेच्या वतीने देण्यात आला आहे.

शनिवारी जिल्ह्यात २०१ रुग्णांची नोंद

औरंगाबाद जिल्ह्यात शनिवारी (२७ जून) सकाळी २०१ कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली. यामधील १२५ रुग्ण मनपा हद्दीतील, ७६ रुग्ण ग्रामीण भागातील आहेत. त्यामध्ये ११४ पुरूष, ८७ महिला आहेत. आतापर्यंत एकूण ४७२३ कोरोना बाधित आढळले असून २३७३ कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. २३४ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता २११६ रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी