कोरोनाची लस घेतलेल्या पोलिसाचा मृत्यू, औरंगाबादेतील घटना

औरंगाबाद
अजहर शेख
Updated Feb 21, 2021 | 17:54 IST

Corona's vaccinated policeman dies : पोलीस कर्मचारी कर्तव्यावर असताना श्वास घेण्यास त्या अडचण येत असल्याने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले होते, मात्र, उपचारादरम्यान त्या पोलीस हवालदाराची प्राणज्योत मालवली.

Corona's vaccinated policeman dies
कोरोनाची लस घेतलेल्या पोलिसाचा मृत्यू, औरंगाबादेतील घटना   |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

  • उपचारादरम्यान कोरोनाची लस घेतलेल्या पोलिसाचा मृत्यू
  • हर्सूल पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली
  • दोन आठवड्यापूर्वी लस घेतलेल्या जिल्हाधिकाऱ्यांना कोरोनाची लागण

औरंगाबाद : गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोनाचे (corona) रुग्ण दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वी कोरोनाचे आकडे कमी झाले होते. मात्र, पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भावाचं प्रमाण वाढत असल्याचे दिसत आहे. कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये कडक निर्बंध देखील लागू करण्यात आले आहेत. कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर लसीकरणाच्या मोहिमेलाही वेग आला असल्याचे दिसत आहे. वैद्यकीय कर्मचारी आणि फ्रंटलाईन वर्कर, तसेच पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लस दिली जात आहे. मात्र, औरंगाबादेत कोरोनाची लस घेतलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याचा (police) मृत्यू झाल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. त्यामुळे देण्यात येणारी लस कितपत सुरक्षित? असा सवाल देखील विचारला जाऊ लागला आहे.

उपचारादरम्यान कोरोनाची लस घेतलेल्या पोलिसाचा मृत्यू

सदर पोलीस कर्मचारी कर्तव्यावर असताना श्वास घेण्यास त्या अडचण येत असल्याने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले होते, मात्र, उपचारादरम्यान त्या पोलीस हवालदाराची प्राणज्योत मालवली. सदर पोलीस हवालदाराने आठ दिवसांपूर्वी कोरोनाची लस घेतली होती. भास्कर शंकर मेटे असं पोलीस हवालदाराचे नाव होते. भास्कर शंकर शेटे हे पोलीस हवालदार बेगमपुरा पोलीस ठाण्यात कार्यरत होते.

हर्सूल पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली

सदर पोलीस हवालदाराला सिटी स्कॅनमध्ये कोरोनाची लक्षणेही आढळली आली असल्याची माहिती समोर आली आहे. कर्तव्यावर असताना श्वास घेण्यास अडचण येत असल्याने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. असून, हर्सूल पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आलीय. १३ फेब्रुवारीला कोरोना लसीचा पहिला डोस भास्कर शंकर मेटे या पोलीस हवालदारानं घेतला होता, त्यांचे निधन झाले असून, सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

दोन आठवड्यापूर्वी लस घेतलेल्या जिल्हाधिकाऱ्यांना कोरोनाची लागण

उस्मानाबाद जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर (Kaustubh Divegaonkar) यांचा कोरोना (corona) अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. दरम्यान, कौस्तुभ दिवेगावकर यांनी २ आठवड्यापूर्वीच कोरोनाची लस घेतली होती. मात्र, लस घेतल्यानंतर तब्बल २ आठवड्यानंतर त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे कोरोना लसीच्या प्रभावाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्हाधिकारी घरीच उपचार घेत आहेत. विशेष म्हणजे जिल्हाधिकारी यांनी कोरोनाच्या कोव्हॅक्सिन लसीचा पहिला डोस या महिन्याच्या सुरुवातीला घेतलेला होता. त्यामुळे लसीच्या प्रभावबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. 

ताप असल्याने डॉक्टरांनी कोरोना चाचणीचा सल्ला दिला होता

जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावाकर यांना कोरोनाची साम्य लक्षणे जाणवत होती. अंगात थोडी ताप देखील असल्याने डॉक्टरांनी त्यांना कोरोना चाचणीचा सल्ला दिला होता. त्यानुसार जिल्हाधिकारी यांनी चाचणी केली होती आणि त्यानंतर त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये प्राथमिक तपासणी व उपचाराची दिशा ठरवून दिल्यानंतर ते आता विलगीकरणात आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी