rtpcr every week for student professor लसीचा २ डोस घेतले असले तरी दरमहा आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक , एक डोस घेतलेल्यांसाठी 'हा' आहे नियम

Aurangabad rtpcr every week for student professor : दोन्ही डोस घेतले असले तरी  औरंगाबादमध्ये प्रत्येक महिन्याला आरटीपीसीआर चाचणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे

Aurangabad rtpcr every week for student professor
लसीचा २ डोस घेतले असले तरी दरमहा आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • दोन्ही डोस घेतले तरी दरमहा आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक
  • विद्यार्थी एकमेकांच्या जवळ बसत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे
  • वेळप्रसंगी जिल्ह्यातील सर्व नागरिकांसाठी हा नियम लागू करण्यात येणार

rtpcr every week for student professor औरंगाबाद : काही दिवसांपूर्वी औरंगाबादचे जिल्हाधिकारी यांनी लस घेतली असेल तरच त्या मद्यप्रेमींना दारू मिळणार असल्याचा नियम काढला होता. लसीचे २ डोस पूर्ण झाले असतील तरच दारू मिळणार असून, दुकान विक्रेत्यांना याबाबत खात्री करण्याचे व नियमांचे पालन करण्याचे बंधन घालण्यात आले होते. औरंगाबाद जिल्ह्यातील मद्यप्रेमींसाठी हा नियम घालून देण्यात आला होता. दरम्यान, पुन्हा औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी नवीन नियम काढला असल्याने नागरिकाची चांगलीच तारांबळ उडणार आहे हे मात्र, खर. आता दोन्ही डोस घेतले असले तरी  औरंगाबादमध्ये प्रत्येक महिन्याला आरटीपीसीआर चाचणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. तर, एक डोस घेतलेल्यांना दोन आठवड्यांनी तर एकही डोस न घेणाऱ्यांना प्रत्येक आठवड्याला चाचणीची सक्ती करण्यात आली आहे. हा नियम सध्या विध्यार्थी आणि प्राध्यापकांना घालून देण्यात आला आहे. त्याचबरोबर  वेळप्रसंगी जिल्ह्यातील सर्व नागरिकांसाठी हा नियम लागू करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे. नव्या कठोर नियमामुळे नागरिकांची चिंता वाढली आहे.

अन्यथा शासकीय पर्याय वापरुन त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल

महाविद्यालयात सुरू झाल्याने गर्दी वाढते आहे. विद्यार्थी एकमेकांच्या जवळ बसत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.जिल्ह्यातील जे नागरिक दुसऱ्या डोससाठी पात्र आहेत परंतु त्यांनी अद्यापही दुसरा डोस घेतलेला नाही अशा नागरिकांनी  १५  डिसेंबरपर्यंत दुसरा डोस पूर्ण करावा, अन्यथा शासकीय पर्याय वापरुन त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असे औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सांगितले आहे. कोरोनाचा नवा स्ट्रेन ओमायक्रॉनपासून बचाव करण्यासाठी लसीकरण हाच प्रभावी उपाय आहे.  त्यामुळे पात्र नागरिकांनी तात्काळ लसीकरण करुन लसीकरण मोहिमेला प्रतिसाद द्यावा, असे आवाहन देखील जिल्हाधिकारी यांनी केले आहे.   

15 डिसेंबरपर्यंत कोरोना स्थितीचा आढावा घेऊन निर्णय घेण्यात येईल

पालिका क्षेत्रातील पहिली ते सातवीपर्यंतच्या शाळा उघडण्याचा निर्णय १५ डिसेंबरनंतर घेऊ, असं पालिका आयुक्त अस्तिककुमार यांनी म्हटलं आहे. १५ डिसेंबरपर्यंत कोरोना स्थितीचा आढावा घेऊन निर्णय घेण्यात येईल अशी माहिती त्यांनी दिली आहे. आता शाळा महाविद्यालय सुरू झालेले आहेत, त्यामुळे महाविद्यालय, खाजगी क्लासेसमधील ज्या शिक्षकांनी कोविडच्या दोन्ही लसी घेतलेल्या आहेत, त्या शिक्षकांनी महिन्यातून एकदा आणि ज्यांनी लस घेतलेली नाही अशा शिक्षकांनी प्रत्येक आठवड्याला कोविड चाचणी करणे बंधनकारक आहे. रंगाबाद महापालिका क्षेत्रातील शाळा उघडण्याचा निर्णय देखील लांबणीवर पडली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी