औरंगाबादमध्ये भीषण अपघात, तीन सख्ख्या भावंडांचा मृत्यू

aurangabd accident truck crushes brother and two sisters : ही घटना गुरुवारी सकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास घडली आहे. या घटनेत तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. अनिता कचरु लोखंडे (वय 22 वर्ष), निकिता कचरु लोखंडे (वय 18 वर्ष) आणि दीपक कचरु लोखंडे (वय 20 रा. आसाराम बापू नगर रांजणगाव शेणपुंजी) अशी तिघांची नावे आहेत.

aurangabd accident truck crushes brother and two sisters
औरंगाबादेत घडला भीषण अपघात, तिघा सख्ख्या भावंडांचा मृत्यू   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • औरंगाबादमध्ये एक भीषण अपघात घडला आहे
  • गुरुवारी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडली  घटना
  • या अपघातात 3 भावंडांचा मृत्यू झाला आहे

औरंगाबाद : मराठवाड्यात अपघाताचे सत्र थांबता थांबत असल्याचे दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच औरंगाबाद जिल्ह्यामध्ये घडलेल्या एका भीषण अपघातात एकाच कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू झाला होता. त्यांनतर आता पुन्हा एक भीषण अपघात घडला आहे. एमआयडीसी वाळूज भागातील एनआरबी चौकात एका ट्रकने दुचाकीला चिरडले असून, या अपघातात दुचाकीवरील एक भाऊ व दोन बहिणींचा जागीच मृत्यू झाला आहे. लहान बहिणीला कंपनीत सोडण्यासाठी जात असतानाच भावंडांवर काळाने घाला घातला. दुचाकीवर जात असलेल्या तिघा जणांना भरधाव वेगात असलेल्या ट्रकने चिरडले. यामध्ये तिघा सख्ख्या भावंडांचा जागीच मृत्यू झाला. अवघ्या 18 ते 22 वर्ष वयोगटातील तिघे एकाएकी गेल्याने कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे.

अधिक वाचा ; Ullu Appवर आहेत अशा काही वेबसिरीज ज्या एकट्यानेच पाहू शकतात

गुरुवारी सकाळी घडली  घटना

मिळालेल्या महितीनुसार, ही घटना गुरुवारी सकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास घडली आहे. या घटनेत तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. अनिता कचरु लोखंडे (वय 22 वर्ष), निकिता कचरु लोखंडे (वय 18 वर्ष) आणि दीपक कचरु लोखंडे (वय 20 रा. आसाराम बापू नगर रांजणगाव शेणपुंजी) अशी तिघांची नावे आहेत. ही घटना सकाळी वाळूज औद्योगिक नगरीतील एन. आर. बी. चौकात घडली. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. दुचाकीवर जात असताना भरधाव वेगात असलेल्या ट्रकने तिघांना चिरडले असल्याचे प्रत्यक्षदर्शीने सांगितले आहे.

अधिक वाचा ; म्हणून पतीने केलं पत्नीचं टक्कल, सोलापुरातील धक्कादायक घटना 

अशी घडली घटना?

दीपकच्या दोन्ही बहिणी कंपनीत कामाला होत्या.तो आपल्या बहिणीला नेहमीप्रमाणे कंपनीत सोडायला निघाला होता. मात्र, आज या तिघांची वाट पाहत जणू काही मृत्युचं थांबला होता. कारण, दीपक आपल्या बहिणीला सोडायला कंपनीत जात असताना रांजणगाव शेंनपूजी फाट्याजवळ असलेल्या एन.आर.बी. चौकालगत भरधाव वेगात येणाऱ्या (एम.एच. 04 . एफ. जे. 5288) या क्रमांकाच्या ट्रकने दीपकच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. ट्रकचे चाक अंगावरून गेल्याने तिघेही गंभीररित्या जखमी झाले होते. त्यानंतर तिघांचाही जागीच मृत्यू झाला.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी