Aurangabad: रिक्षा चालकाकडून अश्लील चाळे, घाबरलेल्या मुलीने धावत्या रिक्षातून मारली उडी, LIVE VIDEO आला समोर

Aurangabad girl jumps from running auto rickshaw: औरंगाबादमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका अल्पवयीन मुलीने धावत्या रिक्षातून उडी घेतली आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.

auto driver molests girl in aurangabad minor girl jumps from running autorickshaw watch shocking video
Aurangabad: रिक्षा चालकाकडून अश्लील चाळे, घाबरलेल्या मुलीने धावत्या रिक्षातून मारली उडी, LIVE VIDEO आला समोर 

Aurangabad News: महाराष्ट्रात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. काही दिवसांपूर्वी ठाण्यात एका शाळकरी मुलीची रिक्षाचालकाने छेड काढल्याचं समोर आलं होतं. या घटनेनंतर आता औरंगाबादमध्ये धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. रिक्षा चालकाने अश्लील चाळे करत आक्षेपार्ह प्रश्न विचारले त्यानंतर घाबरलेल्या मुलीने रिक्षातून उडी मारली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. (auto driver molests girl in Aurangabad minor girl jumps from running autorickshaw watch the shocking video)

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, औरंगाबादमधील सिल्लेखाना ते तारभवन मार्गावर ही घटना घडली आहे. रविवारी दुपारच्या सुमारास अल्पवयीन मुलगी ही क्लासेस संपल्यावर आपल्या घरी जाण्यासाठी निघाली. त्यावेळी ती एका रिक्षात बसली. रिक्षा सुरू झाल्यावर चालकाने तिला अश्लील प्रश्न विचारण्यास सुरुवात केली इतकेच नाही तर अश्लील चाळेही करू लागला.

रिक्षाचालकाचं हे कृत्य पाहून अल्पवयीन मुलगी घाबरली. त्यानंतर रिक्षाचालकाने आपल्या गाडीचा वेग वाढवला. त्यामुळे ही मुलगी आणखीच घाबरली आणि तिने धावत्या रिक्षातून उडी मारली. ही संपूर्ण घटना तेथे लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीत कैद झाली आहे.

हे पण वाचा : दातांचा पिवळेपणा दूर करण्यासाठी घरगुती उपाय

रविवार (13 नोव्हेंबर) दुपारच्या सुमारास ही घटना घडली. घाबरलेल्या अल्पवयीन मुलीने धावत्या रिक्षातून उडी मारली. त्यानंतर आरोपी चालकाने घटनास्थळावर न थांबता तेथून पळ काढला. मुलगी रस्त्यावर पडल्याचं पाहून पाठीमागून येणाऱ्या कार चालकाने आणि एक दुचाकीस्वार तिच्या मदतीसाठी धावले. पीडित मुलीच्या डोक्याला दुखापत झाली असून तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

हे पण वाचा : कोणत्या राशीची व्यक्ती फोनवर कशा प्रकारे बोलते?

या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी आरोपी रिक्षाचालकाला ताब्यात घेत चौकशी सुरू केली आणि त्यानंतर त्याला अटक केली. आरोपी रिक्षाचालकाचे नाव सय्यद अकबर सय्यद हमीद असे असून तो 39 वर्षीय आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी