Babanrao Lonikar : औरंगाबाद : मार्च एन्डिंग असल्याने महावितरणाचे अधिकारी वीज बिल न भरणाऱ्यांची वीज तोडत तोडत असल्याचं दिसत आहे. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून, वीज बिल भरणा न केलेल्या नागरिकांची वीज तोडणी राज्यभरातील वीज कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत आहे. मात्र, मार्च अखेर असल्याने हे प्रमाण मोठ्या प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. मात्र, भाजपच्या एका बड्या नेत्याच्या बंगल्याचीवीज कापून मीटर देखील घेऊन गेल्याने भारतीय जनता पार्टीचे नेते तथा आमदार बबनराव लोणीकर हे चांगलेच संतापले असल्याचं दिसून येत आहे. दरम्यान, त्यांनी वीज महावितरणाच्या अधिकाऱ्याला फोन केला आणि शिवीगाळ देखील केला असल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. त्याचबरोबर त्यांनी महावितरणाच्या अधिकाऱ्याला धमकावले देखील असल्याची माहिती मिळाली आहे. सदर घटनेचा संपूर्ण ऑडिओ क्लिप सोशल मिडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे.
अधिक वाचा : IPL: टीम इंडियातून पत्ता कट झाल्यावरही सुधरला नाही हा खेळाडू
दरम्यान, आमदार बबनराव लोणीकर यांनी अधिकाऱ्याला फोनवर चांगलाच दम भरला असल्याचं समोर आलं आहे. व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये लोणीकर म्हणतात की, आम्ही नियमीत बिल भरतो. मीटर काढून नेलं आणि तू नाही कसं म्हणतो. आयकर विभागची धाड टाकीन, तुम्ही कुठं संप्तती घेतली, कुठे पैसे कमावता, आम्ही तुमची माहिती ठेवतो असंही आमदार बबनराव लोणीकर यांनी महावितरणच्या कर्मचाऱ्याला धमकावलं आहे. औरंगाबादमधील सातारा परिसरातील बंगल्याचे मीटर काढून नेल्याने आमदार बबनराव लोणीकर यांनी वीज कर्मचाऱ्याला शिवीगाळ केली. बिल भरलं तरी बंगल्याचं मीटर का काढलं? तिकडे झोपडपट्टीत जाऊन मीटर काढा असंही बबनराव लोणीकर यांनी म्हटलं आहे. लोणीकर यांची ही ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर लोणीकर यांच्यावर सर्व स्तरातून टीका होऊ लागली आहे.
अधिक वाचा : कार घेण्याची Desire पूर्ण करण्यासाठी किती लागेल डाउनपेमेंट
अधिक वाचा : सनरुफवाली Maruti Brezza आली, जाणून घ्या कारची वैशिष्ट्ये