उस्मानाबाद : शिवसेनेचे नेते तथा मंत्री एकनाथ शिंदे हे शिवसेनेच्या काही आमदारांना घेऊन सध्या गुवाहटी येथे एका हॉटेलमध्ये मुक्कामाला आहेत. शिंदे यांनी एकप्रकारे शिवसेनेविरोधात बंड पुकारले आहे. शिंदे यांच्या या बंडामुळे शिवसेना मात्र, मोठ्या अडचणीत सापडली आहे. दरम्यान, कालपासून शिंदे यांची वरिष्ठ नेते समजूत काढत असल्याचं पहायला मिळत आहे. मात्र, शिंदे कोणाचेही ऐकायला तयार नाहीत. याचवेळी राज्यातील शिवसैनिकांमध्ये मोठ संभ्रमाचे वातावरण आहे. दरम्यान, आज देखील शिवसेनेचे काही आमदार एकनाथ शिंदे यांच्या गळाला आहेत. याच पार्श्वभूमीवर बाळासाहेब ठाकरे यांच्या जुन्या भाषणाचा व्हिडीओ सोशल मिडिया वरती प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये बाळासाहेब ठाकरे हे शिवसेनेतून फुटणाऱ्या आमदारांना थेट रस्त्यावर तुडवा असं म्हणत आहेत.
अधिक वाचा : Chanakya Niti: नवऱ्यानं बायकोला काय सांगावं काय सांगू नये
शिवसेनेच्या तिकिटावर निवडून यायचं आणि बदमाश दुसरीकडे जातात. मग अशा लोकांना काय ओवाळायाचं का? यापुढे तुम्हाला सांगतो एक आमदार जरी शिवसेनेतून फुटला, तर मात्र कायद्याची परवा न करता त्याला रस्त्यात तुडवा. असं बाळासाहेब ठाकरेयांच्या जुन्या व्हिडीओत त्यांनी म्हटलं आहे. हा व्हिडीओ सोशल मिडियावरती प्रचंड व्हायरल होत आहे.
अधिक वाचा : मनसेचे नगरसेवक फोडणाऱ्या शिवसेनेला आठवले राज ठाकरेंचे शब्द
महाराष्ट्रातील राजकीय गोंधळाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मातोश्रीवर जाणार असल्याची बातमी आहे. ते मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान वर्षा बंगला सोडणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. किंबहुना त्यांनी तसे संकेत दिले आहेत. जनतेला संबोधित करताना त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, मी माझा राजीनामा तयार केला आहे. आमदार परत या, माझा राजीनामा घ्या. आमदारांनी माझा राजीनामा राज्यपालांकडे सोपवावा. मी जाऊ शकत नाही कारण मला कोरोनाचा त्रास आहे. राज्यपालांनी विचारल्यास मी यायला तयार आहे. ही माझी कोणत्याही प्रकारे सक्ती नाही. सत्तेशिवाय मोठ्या आव्हानांचा सामना केला. मला शिवसेनाप्रमुखपदी राहण्याचा मोह आवरला नाही. माझ्यासमोर बसा, मी राजीनामा देतो.
अधिक वाचा : ही आसने रक्तातील साखर कमी करण्यासाठी प्रभावी, वाचा सविस्तर