बळीराजाची दिवाळी होणार गोड, शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार 3 हजार 600 कोटींची मदत!

औरंगाबाद
भरत जाधव
Updated Oct 26, 2021 | 09:23 IST

अतिवृष्टीमुळे (Heavy Rain) मराठवाड्यातील (Marathwada) शेतकरी (Farmers) त्रस्त झाले आहेत. अतिवृष्टीमुळे हातातोंडाशी आलेले पिके पाण्यात वाहून गेले

Rs 3,600 crore will be credited to farmers' accounts
शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार 3 हजार 600 कोटींची मदत!  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • जालना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात कृषी आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
  • शेतपिकांच्या झालेल्या नुकसानीपोटी मदत म्हणून पहिल्या टप्प्यात शेतकऱ्यांच्या खात्यात 350 कोटी रुपये जमा करण्याची प्रक्रिया वेगात सुरू
  • सामूहिक शेततळे योजनेस प्रोत्साहन देण्यात येणार - कृषीमंत्री

जालना : अतिवृष्टीमुळे (Heavy Rain) मराठवाड्यातील (Marathwada) शेतकरी (Farmers) त्रस्त झाले आहेत. अतिवृष्टीमुळे हातातोंडाशी आलेले पिके पाण्यात वाहून गेले. उत्पन्न नसल्याने ऐन दिवाळीच्या सणावर बळीराजा हताश झाला आहे. पण आता शेतकऱ्यांची दिवाळी (Diwali) गोड होणारी गूड न्यूज अखेर कृषीमंत्री दादा भुसेंनी (Dadaji Bhuse) दिली आहे. '3 हजार 600 कोटी रुपयांचा निधी दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार असल्याची माहिती दादाजी भुसे यांनी दिली आहे.

जालना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात कृषी आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी उपस्थित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना दादाजी भुसे यांनी शेतकऱ्यांना निधी वाटप केल्याबद्दलची माहिती दिली. शासन शेतकऱ्यांप्रती सकारात्मक दृष्टीकोन ठेऊन काम करत असून अतिवृष्टीमुळे जून महिन्यात शेतपिकांच्या झालेल्या नुकसानीपोटी मदत म्हणून पहिल्या टप्प्यात शेतकऱ्यांच्या खात्यात 350 कोटी रुपये जमा करण्याची प्रक्रिया वेगात सुरू आहे, असे भुसे यांनी सांगितले.

'जागतिक बँकेच्या अर्थसहाय्यातून नानाजी देशमुख कृषी संजिवनी योजना राबविण्यात येत असून या योजनेंतर्गत सामूहिक शेततळ्यांना शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद आहे. येणाऱ्या काळात सामूहिक शेततळे योजनेस प्रोत्साहन देण्यात येणार असल्याचे सांगत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून अस्तरीकरणाचा प्रलंबित असलेला प्रश्न मार्गी लावण्यात येणार असल्याचेही दादा भुसे यांनी सांगितले. 'शेतकऱ्यांना लागवडीसाठी पीककर्जाची मोठ्या प्रमाणात आवश्यकता असते. जालना जिल्ह्यात शेतकऱ्यांना कमी प्रमाणात पीककर्ज मिळाले असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या असून याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व बँक अधिकाऱ्यांचा आढावा घेण्याची सुचनाही त्यांनी यावेळी केली.


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी