पोलिसांच्या हातात काठी ऐवजी बॅट आणि....

औरंगाबाद
अजहर शेख
Updated Jul 15, 2020 | 10:54 IST

Batting instead of stick in the hands of police: सतत हातात आसलेली काठी पोलिसांनी बाजूला ठेवत, क्रिकेटची बॅट घेऊन औरंगाबादमध्ये मोकळ्या रस्त्यावर क्रिकेटचा आनंद लुटला आहे.

Police playing cricket
पोलिसांच्या हातात काठी ऐवजी बॅट आणि....  |  फोटो सौजन्य: Facebook

थोडं पण कामाचं

  • औरंगाबादमध्ये मोकळ्या रस्त्यावर क्रिकेटचा आनंद लुटला
  • औरंगाबादेत १८ जुलै पर्यंत संचार बंदी
  • कर्मचारी बनले गोलंदाज, अधिकारी बनले फलंदाज

औरंगाबाद:  कोरोना (corona) सारख्या महामारीचां सामना करण्यासाठी तीन महिन्याहून अधिक काळापासून पोलीस (police) आपलं कर्तव्य चोखपणे बजावत आहेत. २४ तास ऑन ड्युटी असलेल्या पोलिसांचे औरंगाबादेत (aurangabad police) वेगळेच रूप पाहायला मिळाले आहे. सतत हातात आसलेली काठी पोलिसांनी बाजूला ठेवत, क्रिकेटची बॅट (bat) हातात घेऊन औरंगाबादमध्ये मोकळ्या रस्त्यावर क्रिकेटचा आनंद लुटला आहे. औरंगाबाद शहरात (aurangabad city) सध्या कडक संचार बंदी (carfiu) लागू करण्यात आली असून, नागरिकांचा देखील संचारबंदीला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे पोलिसांवरील थोडा का होईना पण ताण हलका झाला असल्याने त्यांनी क्रिकेट खेळत क्षीण घालवला आहे. पोलिसांनी खेळलेल्या क्रिकेट (cricket) मॅचचा व्हीडीओ देखील सोशल मीडिया वरती प्रचंड व्हायरल झाला आहे.

कर्मचारी बनले गोलंदाज, अधिकारी बनले फलंदाज

पोलिसांनी औरंगाबादच्या मोकळ्या रस्त्यावरती क्रिकेटचा आनंद घेतला असून, या क्रिकेटच्या सामन्यात पोलीस कर्मचारी गोलंदाज बनले होते, आणि अधिकारी हे फलंदाज बनले होते. कर्मचारी आणि अधिकारी यांचा क्रिकेटचा सामना खूप वेळ रंगला होता. ज्यामध्ये अधिकाऱ्यांनी चांगलीच बॅटिंग केली आहे.

खुर्चीला बनवलं स्टंप

औरंगाबाद शहरातील शहागंज येथे असलेल्या मध्यवस्तीच्या भागात मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. बंदोबस्त सुरु असताना क्रिकेट खेळण्याचा मोह पोलिसांना आवरता आला नाही. बॅट आणि चेंडूची व्यवस्था कशीबशी झाली मात्र स्टंपची व्यवस्था न झाल्याने सरळ खुर्चीलाच स्टंप बनवले आणि क्रिकेटचा आनंद लुटला. संचारबंदीच्या काळात टवाळखोरांवर, तसेच विनाकारण बाहेर फिरणाऱ्या, तसेच वाहनांची तपासणी करण्याची मोहीम सध्या पोलिसांकडून राबवली जात आहे.

औरंगाबादेत १८ जुलै पर्यंत संचार बंदी

गेल्या अनेक दिवसांपासून औरंगाबाद आणि जवळच्या भागात कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. वाढत चाललेल्या कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी प्रशासनाच्या वतीने शहरात १८ जुलै पर्यंत कडक संचार बंदी लागू करण्यात आली आहे. दरम्यान प्रशासनाच्या वतीने पहिल्यांदाच लागू करण्यात येणारी संचार बंदी कडक असल्याचे सांगण्यात आले होते.  

आता लॉकडाऊन वाढणार नाही

औरंगाबादमध्ये १० जुलै ते १८ जुलै पर्यंत संचार बंदी लागू करण्यात आली आहे. संचारबंदीच्या पहिल्या चार दिवसात नागरिकांनी देखील चांगला प्रतिसाद दिला आहे. मात्र औरंगाबाद येथील रुंगासंख्या कमी होत नसून, बाधितांची संख्या वाढत असल्याने लॉकडाऊन देखील वाढवला जाणार असल्याची अफवा पसरली आहे. मात्र प्रशासनाच्या वतीने लॉकडाऊन वाढणार असल्याच्या अफवांचे खंडन केले गेले आहे.

लोकप्रतिनिधींनी केला होता विरोध?

औरंगाबाद येथे १० जुलै पासून लावण्यात आलेल्या लॉकडाऊनला लोकप्रतीनीधिनी विरोध केला असल्याची माहिती समोर आली आहे. तरीही प्रशासनाच्या आग्रहाखातीर लॉकडाऊन करण्यात आला आहे. दरम्यान प्रशासनाने आता लॉकडाऊन करण्यात येणार नसल्याचे स्पष केले आहे. खासदार भागवत कराड आणि खासदार इम्तेयाज जलील यांनी देखील पुन्हा लॉकडाऊन होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.   

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी