बीड : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार नेहमी आपल्या मास्क घालून दिसतात. गेल्या दोन वर्षात त्यांनी क्वचितच मास्क काढला असेल. सभा असो समारंभ असो किंवा त्यांनी नुकतेच दिलेले अर्थसंकल्पीय भाषण असो. मास्क सतत त्यांचे नाक तोंड झाकत असतात. पण आज बीडमध्ये एका कार्यक्रमात कार्यकर्त्यांनी मागणी केल्यानंतर काही काळाच अजितदादांनी मास्क उतरविला. (Bead Ajit Pawar removed the mask and gave this reason)
मास्क काढताना अजितदादा म्हणाले, सहसा मी मास्क काढत नाही आणि कोणाचं ऐकतही नाही. पण माझी सासरवाडी ही मराठवाड्याची असल्यामुळे मला ऐकावं लागतं आहे आणि म्हणून मास्क खाली काढत आहे. असे म्हणून अजितदादांनी आपला मास्क तोंडावरून काढला आणि कॉलरच्या दिशेने मागे सरकवला. दादांनी मास्क मागे घेतात. एकच जल्लोष झाला. टाळ्या आणि शिट्ट्या वाजू लागल्या.
अजित पवार यांची पत्नी सुनेत्रा पवार या उस्मानाबाद जिल्ह्यातील आहे. उस्मानाबादचे नेते पद्मसिंग पाटील यांच्या त्या भगिनी आहेत. त्यामुळे हा संदर्भ देऊन अजित पवारांनी आपली सासरवाडी मराठवाड्याची आहे असे म्हटले.
मास्क मागे केल्यानंतर दादा थोडंसे हसले आणि त्यांनी पुन्हा आपल्या भाषणाला सुरूवात केली. काय केले भाषण वाचा यातील काही ठळक मुद्दे....