Beed Cattle Fight : बीडमध्ये मोकाट गुरांचा हैदोस, दोन वळुंच्या झुंजीमुळे नागरिक भयभीत

Beed Cattle Fight बीड जिल्ह्यातील गेवराई शहरांमध्ये मोकाट गुरांची संख्या अधिक आहे. हे गुरं शहरातील मुख्य मार्गावर, चौकांमध्ये वर्दळीच्या ठिकाणी सतत वावरत असल्याने नागरिक भयभीत होतात.

थोडं पण कामाचं
  • गेवराई शहरांमध्ये मोकाट गुरांची संख्या अधिक
  • मुख्य मार्गावर, चौकांमध्ये वर्दळीच्या ठिकाणी सतत वावर
  • गेवराईमध्ये दोन वळु आमने सामने

Beed Cattle Fight : बीड : बीड जिल्ह्यातील गेवराई शहरांमध्ये मोकाट गुरांची संख्या अधिक आहे. हे गुरं शहरातील मुख्य मार्गावर, चौकांमध्ये वर्दळीच्या ठिकाणी सतत वावरत असल्याने नागरिक भयभीत होतात. या भितीच्या सावटाखाली त्यांना शहरातील रस्त्यावरुन ये जा करावी लागते. अशातच आज गेवराईमध्ये दोन वळु आमने सामने आले आणि त्यांची चांगलीच जुंपली. यावेळी रस्त्यावरुन किंवा कामानिमित्त शहरात आले असलेले लोकं काही वेळ भयभीत झाले होते.तर दोन वळुंची झुंज पहाण्यासाठी लोकांनी एकच गर्दी केली होती. काहींनी आपल्या मोबाईल कॅमेऱ्यामध्ये व्हिडीओ ही कैद केले. मात्र या मोकाट गुरांची प्रशासनाने व्यवस्था करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी