दाजीने काढला मेव्हण्याचा काटा, अन् केला अपघाताचा बनाव, पोलिसांनी लावला २४ तासात गुन्ह्याचा छडा

Beed district neknur villege murder case : दाजी आणि मेव्हणा यांच्या नात्याला काळीमा फासणारी घटना बीड जिल्ह्यात घडली.

Beed district neknur villege murder case
दाजीने काढला मेव्हण्याचा काटा, अन् केला अपघाताचा बनाव  |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

  • खून केल्यानंतर अपघात झाल्याचा बनाव आरोपींनी केला होता
  • मृत निलेश ढास हा सोमवारी दवाखान्यात मामाला भेटण्यासाठी गेला होता.
  • २४ तासात पोलिसांनी लावला खुनाचा तपास

बीड : दाजी आणि मेव्हणा यांच्या नात्याला काळीमा फासणारी घटना बीड जिल्ह्यात (beed district) घडली आहे. दरम्यान, बायकोचा सख्खा भाऊ आपल्या मुलाला सतत जीवे मारण्याची धमकी देत होता.त्यामुळे नात्याने दाजी असणाऱ्या तरुणाने आपल्या मेव्हण्याचा काटा काढला आहे. सदर मेव्हणा मुलाला जीवे मारण्याची धमकी देत सतत कुटुंबातील व्यक्तींना त्रास देत होता. त्यामुळे ३० वर्षीय दाजीने आपल्या मित्राच्या सोबतीने, बायकोच्या सख्ख्या भावाचा खून (murder) केला असल्याचे धक्कादायक प्रकार बीड जिल्ह्यात घडला आहे.

खून केल्यानंतर अपघात झाल्याचा बनाव आरोपींनी केला होता.

दरम्यान, दाजीने आणि त्याच्या मित्राने मेव्हण्याचा खूण केल्यानंतर खुनाची ओळख पटू नये म्हणून, मेव्हण्याचा अपघात झाल्याचा बनाव केला होता. मात्र, दाजीचा हा प्लॅन फेल ठरला आणि नेकनूर पोलीस ठाण्याचे एपीआय लक्ष्‍मण केंद्रे यांच्या सतर्कतेने, हा खुणाचा गुन्हा अवघ्या २४ तासात उघडकीस आणला. तर नात्याने दाजी असणाऱ्या आरोपी मनोज अंकुश घोडके वय ३० रा.घोडका राजुरी, राजाभाऊ ज्ञानदेव यादव वय २१ रा. वांगी आणि कृष्णा गोपीनाथ डाके वय २७ रा. काठोडा या तिघां आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.

मृत निलेश ढास हा सोमवारी दवाखान्यात मामाला भेटण्यासाठी गेला होता.

खून झालेल्या युवकाचे नाव निलेश ढास असं आहे. निलेश ढासचे याचं वय २५ वर्षे असून, निलेश ढास याच मांजरसुंबा घाटात मंगळवारी सकाळी बुलेटवर अपघात झाल्याचं दिसून आला होता. तर मृत निलेश ढास हा सोमवारी दवाखान्यात मामाला भेटण्यासाठी गेला होता. त्यादरम्यान, निलेश मंगळवारी सकाळी मांजरसुंबा घाटात मयत अवस्थेत आढळला होता. निलेशचा बुलेटचा अपघात झाल्याचे भासविण्यात आले होते. मात्र घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर हा प्रकार खुनाचा प्रकार असल्याचे नेकनूर पोलिस स्टेशनचे एपीआय लक्ष्‍मण केंद्रे यांनी ओळखले आणि त्यांनी तातडीने तपासाला गती देत हा खून असल्याच्या दिशेने तपास सुरू केला. 

खुन का केला ? याची माहिती देत तिन्ही आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे.

सदर घटनेतील मुख्य आरोपी आणि मयत युवकाचा सख्खा दाजी त्याचबरोबर मामाचा मुलगा मनोज अंकुश घोडके वय ३० याला पोलिसांनी अंत्यविधी होताच ताब्यात घेतले. त्यानंतर आज यातील उर्वरित आरोपी राजाभाऊ ज्ञानदेव यादव वय २१ राहणार वांगी , कृष्णा गोपीनाथ डाके वय २७ राहणार काठोडा यांना देखील पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी सदर घटनेचा तपास एपीआय लक्ष्मण केंद्रे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी २४ तासात केला असल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. या दरम्यान खुन का केला ? याची माहिती देत तिन्ही आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी