बीड : महाराष्ट्रात राजकीय घडामोडींना वेग आल्याचे पहायला मिळत आहे. शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करत काही ४० आमदारांना घेऊन गुवाहटी येथे एका गेले आहेत. त्यामुळे, महाराष्ट्रातील महाविकासआघाडी सरकार धोक्यात आले आहे. अशातच बीड येथील एका शेतकऱ्याने अनोखी मागणी केली आहे. राज्यातील सत्ता नाट्य संपेपर्यंत प्रभारी मुख्यमंत्री म्हणून आपल्याला नियुक्ती द्यावी अशी मागणी शेतकऱ्याने महाराष्ट्राच्या राज्यपालांकडे केली आहे. सदर शेतकऱ्याने बीड जिल्हाधिकारी यांच्या मार्फत हे पत्र राज्यपालांना दिले आहे. श्रीकांत विष्णू गदळे असं शेतकऱ्याचे नाव आहे.
अधिक वाचा : जुलैच्या सुरूवातीला बुध बदलणार चाल, या लोकांना होणार फायदा
सदर पत्रात शेतकरी श्रीकांत गदळे यांनी म्हटलं आहे की, ‘चालू विधानसभेचा कार्यकाळ संपला असून, राज्यात घटनात्मक पेच प्रसंग निर्माण झाल्याने शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी प्रभारी मुख्यमंत्री म्हणून नियुक्ती करावी’ असा या पत्राचा मुख्य विषय आहे. २२ जून रोजी श्रीकांत गदळे या शेतकऱ्याने बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये मुख्यमंत्रीपदी नियुक्ती करण्याची मागणी करणारं पत्र सादर केलं आहे. मात्र, यासंदर्भातील माहिती गुरुवारी समोर आली आहे. बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्याला मुख्यमंत्रीपदी नियुक्ती देण्यासंदर्भात विनंती करणारं हे पत्र तात्काळ राज्यापालांकडे पाठवावं, अशी विनंती देखील या शेतकऱ्याने केली आहे.
अधिक वाचा : एवढं धैर्य येतं कुठून? ED अधिकाऱ्याचा राहुल गांधींना सवाल
उपरोक्त विषयानुसार विनंती अर्ज करतो की, मी शेतकरी पुत्र श्रीकांत विष्णू गदळे राहता दहिफळ (वडमाऊली) तालुका केज, जिल्हा बीडचा रहिवाशी आहे. मी १० ते १२ वर्षांपासून राजकारण आणि समाजकारणात अग्रेसर आहे. शेतकरी गोरगरिबांच्या प्रश्नांवर सातत्याने काम करत आहे. सध्या महाराष्ट्रात नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालं आहे. त्यामुळे येथील शेतकरी वर्ग चिंतेत सापडला आहे. अशावेळी सरकारने तात्काळ मदत करणे अपेक्षित होती. मात्र, ती मिळाली नसल्याचं श्रीकांत गदळे या शेतकऱ्याने केली आहे.
अधिक वाचा : VIDEO: नशीब बलवत्तर म्हणून वृद्धानं मृत्यूलाही दिला चकवा
पुढे या शेतकऱ्याने पत्रात म्हटलं आहे की, मुख्यमंत्र्यांना काळजीवाहू अथवा प्रभावी मुख्यमंत्री म्हणून नियुक्ती न देता मला प्रभारी मुख्यमंत्री म्हणून संधी द्यावी. मी जनतेचे सर्व प्रश्न मार्गी लावेन. त्याचबरोबर, बेरोजगारी, आत्महत्याग्रस्त शेतकरी, शेतमजूर, ऊतोड कामगार या सर्वांना न्याय देण्याचं काम मी करेन. त्यामुळे विवाध प्रश्न सोडवण्यासाठी