बीड : बीड जिल्ह्यात (beed district) एका १७ वर्षीय अल्पवयीन तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या (hanging suicide) केल्याची एक धक्कादायक घटना घडली आहे. सततच्या त्रासाला कंटाळून सदर अल्पवयीन तरुणीने आत्महत्या केली असल्याचे बोलले जास्त आहे. या तरुणीला तिच्या घराशेजारीच राहणारा एका तरुण सतत छेड काढत होता. या त्रासाला कंटाळून या तरुणीने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. दरम्यान सदर घटना ही बीड जिल्ह्यातील परळी शहरातील (parali city) सावतामाळी नगर या ठिकाणी घडली आहे.
दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, परळी शहरातील सावतामाळी नगर या ठिकाणी पीडित मुलगी ही राहत होती. ज्या ठिकाणी सदर तरुणी राहत होती त्याच ठिकाणी घराशेजारी आरोपी तरुण राहत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून आरोपीने तरुणाने पीडित तरुणीची छेड काढली होती. सदर पीडित मुलीने तरुणाची तक्रार देखील कुटुंबातील सदस्यांना केली होती. या प्रकरणी सांगितल्यावर त्याच्या घरच्यांनी त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न केला होता. मात्र यावर आरोपी तरुणाने तिच्या घरच्यांचे ऐकले नाही. तो सतत तिला त्रास द्यायचा. शेवटी पीडित मुलीला हा त्रास सहन झाला नाही आणि तिने राहत्या घरातच गळफास घेऊन आपले जीवन संपवले.
पीडित तरुणीने गळफास घेतल्यानंतर पीडित मुलीच्या वडिलांनी संभाजी नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, त्यानंतर संबंधित आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्याला अटक देखील करण्यात आली आहे.
बीडच्या (Beed) गेवराई तालुक्यात (gevarai taluka) असणाऱ्या गोविंदवाडी शिवारात अकरावीच्या वर्गात शिकणाऱ्या १६ वर्षीय मुलीचा मृतदेह एका विहिरीत आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे. सदर १६ वर्षीय मुलगी ही गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता होती. सायली कल्याण पारेकर (वय १६) असं मृत मुलीचं नाव आहे. शहरातील गणेश नगर भागात राहणारी सायली ही १६ नोव्हेंबरला पहाटे घरातून निघून गेली होती.
सायलीने घरातून पडताना सदर सुसाईड नोट लिहून ठेवली होती. "मी मरतेय, माझा शोध घेऊ नका व कोणालाच जबाबदार धरू नका" अशी एक सुसाईड नोट (sucide note) लिहून ठेवली होती. सायलीची सुसाईड नोट आढळून आल्यामुळे एकच खळबळ उडाली होती. तिच्या आई-वडिलांनी पोलिसांमध्ये धाव घेऊन सायली बेपत्ता असल्याची तक्रार दिली होती. तिच्या कुटुंबीयांनी सर्वत्र शोध घेतला होता.