Amrit Mahotsav: बीडची कन्या करणार महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व, दिल्लीकर थिरकरणार

Beed girl will represent Maharashtra in Delhi: दिल्लीत होणाऱ्या अमृत महोत्सवात बीडची कन्या एका तरुणीची सांस्कृतिक मंत्रालयाकडून निवड करण्यात आली आहे. जाणून घ्या या तरुणीचा नेमका प्रवास कसा आहे.

beed girl will represent maharashtra in amrit mahotsav to be held in delhi
Amrit Mahotsav: बीडची कन्या करणार महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व, दिल्लीकर थिरकरणार 
थोडं पण कामाचं
  • दिल्लीत पार पडणार स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवात
  • आजादी का अमृत महोत्सवात अनेक कार्यक्रमाची रेलचेल
  • बीडच्या ऐश्वर्याचा नृत्याविष्कार दिल्लीत पाहायला मिळणार

Azadi Ka Amrit Mahotsav: बीड: दिल्लीत (Delhi) होणाऱ्या अमृत महोत्सवात बीडची (Beed) कन्या ऐश्वर्या बायस ही आता महाराष्ट्राचं (Maharashtra) प्रतिनिधित्व करणार आहे. यासाठी सांस्कृतिक मंत्रालयाकडून तिची  निवड करण्यात आली आहे. 75 व्या अमृत महोत्सवानिमित्त (Amrit Mahotsav) दिल्लीत एक ते पाच ऑगस्टदरम्यान विविध सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. त्यासाठीच ऐश्वर्याची निवड करण्यात आली आहे. 

लावणीवर ठेका धरत नृत्याविष्कार करणारी ऐश्वर्या बायस ही बीड शहरातील पिंगळे गल्लीत राहते. ऐश्वर्या ही सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या तिच्या मेहनतीचं अखेर चीज झालं आहे. कौटुंबिक परिस्थिती ही जेमतेम, वडील संतोष बायस हे ट्रान्सपोर्टचा व्यवसाय करतात. तर आई गृहिणी आहे. तिचा भाऊ हा देखील आयटी इंजिनिअर... वयाच्या पाचव्या वर्षापासून ऐश्वर्याला नृत्याची फार आवड, दरम्यान आतापर्यंत विविध झालेल्या स्पर्धेत तिने 500 हून अधिक पारितोषिक पटकावले आहेत.

अधिक वाचा: Netaji Subhas Chandra Bose grand statue : इंडिया गेटजवळ सुभाषचंद्र बोसांचा पुतळा

कौटुंबिक परिस्थिती जेमतेम असताना देखील ऐश्वर्याने जिद्दीच्या, मेहनतीच्या जोरावर आपलं स्वप्न पूर्ण केलं आहे. लोककला, लोकनृत्य, लोकनाट्य यातून तिने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. सांस्कृतिक मंत्रालयाच्या निवडीनंतर आई-वडिलांना आनंदाश्रू अनावर होत आहेत. मुलीने कष्टाचं चीज केल्याने तिच्या कुटुंबाच्या आनंदाला पारावर उरला नाही.

दिल्लीत संधी मिळाल्याने या संधीचं सोनं करण्याची जिद्द वाखण्याजोगीच म्हणावी लागेल. ग्रामीण भागातील मुलांमध्ये कला गुण असतात. मात्र त्याला व्यासपीठ मिळत नाही. आणि यालाच न जुमानता आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रीत केलं तर नक्कीच यश मिळतं. हेच ऐश्वर्याने सिद्ध करून दाखवलं आहे.

अधिक वाचा: Mahatma Gandhi :महात्मा गांधी यांच्या स्मृतीदिनी सोशल मीडियावर आणि स्टोरीवर शेअर करा त्यांचे विचार

हर घर तिरंगा...

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या ऐतिहासिक प्रसंगी देशाची राजधानी राष्ट्रध्वजाच्या रंगात रंगणार आहे. त्यासाठी आजपासून (२२ जुलै) ‘हर घर तिरंगा’ (Har Ghar Tiranga) मोहीम सुरु झाली आहे. शहरातील प्रमुख रस्ते, बाजारपेठा, उड्डाणपूल, चौक, शाळा, सरकारी इमारती, रुग्णालये राष्ट्रीय तिरंग्याच्या रंगांनी सजवण्यात येणार आहेत. शहरी स्थानिक स्वराज्य संस्था (ULBs) च्या कर्मचार्‍यांना देखील राष्ट्रीय उत्सवाचा उत्साह वाढवण्यासाठी त्यांच्या कॉलरच्या काठावर तिरंगा लावण्यास सांगितले आहे.

अधिक वाचा: अमित शहांनी बघितला अक्षय कुमारचा सम्राट पृथ्वीराज आणि दिली 'ही' प्रतिक्रिया

गेल्या रविवारी 'हर घर तिरंगा अभियाना'संदर्भात गृहमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक बोलावण्यात आली होती, ज्यामध्ये सर्व राज्यपाल, नायब राज्यपाल, मुख्यमंत्री आणि केंद्रशासित प्रदेशांचे प्रशासक सहभागी झाले होते. या संदर्भात लेफ्टनंट गव्हर्नर यांनी दिल्लीचे मुख्य सचिव, एनडीएमसी अध्यक्ष, एमसीडी विशेष अधिकारी, डीडीए उपाध्यक्ष आणि एमसीडी आयुक्त यांच्यासोबत सचिवालयात बैठक घेतली आणि हा कार्यक्रम संस्मरणीय बनवण्यासाठी तपशीलवार सूचना दिल्या.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी