Pritam Munde : प्रितम मुंडेंचा धनंजय मुंडेंवर जोरदार निशाणा, भावा-बहिणींमधील राजकीय वाद शिगेला

beed mp pritam munde on maharashtra minister dhananjay munde : प्रीतम मुंडे यांनी धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधत म्हटलं आहे की, बीड जिल्ह्यात सध्या घर एक जण बांधतोय आणि त्या घराची वास्तुशांती दुसराच कोणीतरी करतोय. त्यामुळे आम्ही बांधलेल्या घराची वास्तुशांती राष्ट्रवादींच्या लोकांनी करू नये. सध्या राष्ट्रवादी आयत्या बिळात नागोबा होऊन बसण्याचं काम करत आहे , अशी टीका प्रीतम मुंडे यांनी केली.

beed mp pritam munde on maharashtra minister dhananjay munde
प्रितम मुंडेंचा धनंजय मुंडेंवर जोरदार निशाणा  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • प्रीतम मुंडे यांनी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार निशाणा साधला
  • प्रीतम मुंडे यांनी धनंजय मुंडे यांना उद्देशून 'आयत्या बिळात नागोबा', असा उल्लेख केला
  • कोणी कितीही नारळ फोडा, जनता हुशार आहे", असा टोला प्रितम मुंडे यांनी लगावला

Pritam Munde : बीड : बीड जिल्ह्याच्या खासदार प्रीतम मुंडे यांनी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. विकासकामांच्या श्रेयवादावरुन प्रितम मुंडे यांनी मंत्री धनंजय मुंडे यांना उद्देशून 'आयत्या बिळात नागोबा', असा उल्लेख केला आहे. दरम्यान, मुंडे बंधू-भगिणींमध्ये अशाप्रकारचा निशाणा साधण्याची ही पहिली वेळ नाही. याअगोदर देखील मुंडे बंधू-भगिणींमध्ये सातत्याने आरोप-प्रत्यारोपाच्या फैऱ्या झडत असतात. मात्र, यावेळी दोघा भावा-बहिणींमधील राजकीय वाद आतादेखील शिगेला पोहोचला आहे. पूर्वी धनंजय मुंडे यांच्यावर माजी मंत्री पंकज मुंडे या धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधत होत्या. यावेळी मात्र, भाजप खासदार प्रितम मुंडे (Pritam Munde) यांनी धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला आहे.

अधिक वाचा : नंदुरबार जिल्ह्यात डाकिण म्हणत महिलेला विवस्त्र करत मारहाण

कोणी कितीही नारळ फोडा, जनता हुशार आहे", असा टोला प्रितम मुंडे यांनी लगावला

प्रीतम मुंडे यांनी धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधत म्हटलं आहे की, बीड जिल्ह्यात सध्या घर एक जण बांधतोय आणि त्या घराची वास्तुशांती दुसराच कोणीतरी करतोय. त्यामुळे आम्ही बांधलेल्या घराची वास्तुशांती राष्ट्रवादींच्या लोकांनी करू नये. सध्या राष्ट्रवादी आयत्या बिळात नागोबा होऊन बसण्याचं काम करत आहे, अशी टीका प्रीतम मुंडे यांनी केली. पंकजा मुंडे पालकमंत्री असतानाही सगळी काम मंजूर झाले आहेत. कोणी कितीही नारळ फोडा, जनता हुशार आहे, असा टोला प्रितम मुंडे यांनी लगावला. आम्ही मंजूर करून आणलेल्या कामांच्या भूमिपूजनाचे नारळ कोणाला फोडायचे ते फोडू द्या. "राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचे आयत्या बिळात नागोबा, अशी व्यवस्था झाली आहे" असं प्रीतम मुंडे म्हणाल्या.

अधिक वाचा : आपल्या 'बॉडी टाइप'नुसार झटपट वजन कमी करण्याचे सोपे उपाय 

माझी कमिटमेंट ही मातीतल्या माणसांसाठी काम करत राहणे – धनंजय मुंडे

काही दिवसांपूर्वी "एक बार मी कमिटमेंट केली की ती मी पूर्ण करते" , असा टोला पंकजा यांनी धनंजय यांना लगावला होता. यावर माध्यमांनी धनंजय मुंडे यांना पंकजा यांच्या टीकेवर प्रश्न विचारला असता त्यांनी त्या प्रश्नावर रोखठोक उत्तर दिलं होतं. "ज्या कोणी कमिटमेंट केली आहे ते शोधणं पत्रकारांचं काम आहे. कोणी किती निधी, किती काम केलं. माझी कमिटमेंट ही मातीतल्या माणसांसाठी काम करत राहणे ही आहे", असं उत्तर धनंजय मुंडे यांनी दिलं होतं.

अधिक वाचा : पंतप्रधान संग्रहालयाचे तिकिट काढण्यासाठी आता वापरा पेटीएम

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी