औरंगाबादेतील एका तरुणाची भोंदूबाबाने केली तब्बल दहा लाखांची फसवणूक, पैसे परत मागितल्यावर म्हणाला तुला कोंबडा बनवेल

Bhondubaba cheated a young man from Aurangabad for ten lakhs : आरोपीनं पैसे परत देण्यास नकार दिला. तसेच 'घटनेची वाच्यता केल्यास तुला कोंबडा बनवेल. माझ्याकडे अघोरी विद्या आहे', अशी भीती आरोपीनं फिर्यादीला दाखवली. या प्रकारानंतर अखेर रफत यांनी औरंगाबाद पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे.

Bhondubaba cheated a young man from Aurangabad for ten lakhs
तरुणाची भोंदूबाबाने केली तब्बल दहा लाखांची फसवणूक  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • छोट्या छोट्या घरगुती कारणातून त्यांच्या घरात वाद होतं होते.
  • रोख रक्कम आणि दागिन्यांच्या स्वरुपात ९ लाख ९५ हजार रुपये लुटले आहे
  • 'घटनेची वाच्यता केल्यास तुला कोंबडा बनवेल. माझ्याकडे अघोरी विद्या आहे' - भोंदूबाबाने दिली धमकी

औरंगाबाद : औरंगाबादेतील एका तरुणाची तब्बल दहा लाखांची फसवणूक केली आहे. एका भोंदूबाबाने ही फसवणूक केल्याची घटना घडली आहे. तुमच्या घरात ९६ किलो गुप्तधन (96 Kg secret wealth) असल्याचं सांगून घरात शांतता प्रस्थापित करणं आणि गुप्तधन शोधून काढण्याच्या नावाखाली फिर्यादीकडून वेळोवेळी पैसे उकळले आहेत. दरम्यान , भोंदूबाबाने ९ लाख ९५ हजार रुपये उकळले आहेत. मात्र, मोठ्या प्रमाणात पैसे देऊन देखील गुप्तधन मिळाले नसल्याने आपली फसवणूक झाल्याचे तरुणाला कळताच त्याने भोंदूबाबाकडे आपले पैसे परत मागितले. मात्र, आरोपीनं 'माझ्याकडे अघोरी विद्या असून तुला कोंबडा बनवेल' अशी धमकी दिली असून, तरुणाने थेट पोलीस ठाणे गाठले आणि अखेर पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

छोट्या छोट्या घरगुती कारणातून त्यांच्या घरात वाद होतं होते

दरम्यान , सदर प्रकरणात फसवणूक झालेल्या युवकाचे नाव शेख रफत शेख करीम असं असून, दिवसांपासून त्याच्या घरात अशांतता होती. शेख रफत शेख करीम यांच्या घरात अगदी छोट्या छोट्या घरगुती कारणातून त्यांच्या घरात वाद होतं होते. त्यामुळे कुटुंबातील सर्वजण तणावात असायचे. त्यामुळे त्यांच्या एका मित्राने घरात शांती प्रस्थापित करण्यासाठी मानवत येथील सायलू महाराजांची भेट घेण्याचा सल्ला दिला होता. यामुळे फिर्यादी रफत त्यांची पत्नी आणि मित्र असे तिघेजण मानवत याठिकाणी महारांजी भेट घ्यायला गेले. पण यावेळी तिघांना सिताराम महाराज भेटला.

रोख रक्कम आणि दागिन्यांच्या स्वरुपात ९ लाख ९५ हजार रुपये लुटले आहे

सीताराम महाराज यांनी फिर्यादीलां मोठ्या प्रमाणात गंडा घातला आहे. सिताराम याने 'तुमच्यावर करणी केली आहे' असं सांगितलं असल्याने फिर्यादी यांनी आमच्यावर केलेल्या करणीचा चांगला इलाज करा असा फिर्यदिने सीताराम महाराज यास सांगितले त्यावर आरोपीने आपल्या घरी येऊन पाहणी करावी लागेल, अशी भीती दाखवली. त्यासाठी ९६ हजार रुपये इतका खर्च येईल असे सांगितले. पैसे दिल्यानंतर आरोपी फिर्यादीच्या घरी आला. त्याने घरावर सापाचा साया आहे. तसेच घरात ९६ किलो गुप्त धन असल्याचंही फिर्यादीला सांगितलं. संबंधित गुप्तधन मिळवून देण्यासाठी पूजा घालावी लागेल. असं सांगून आरोपीनं फिर्यादीकडून वेळोवेळी रोख रक्कम आणि दागिन्यांच्या स्वरुपात ९ लाख ९५ हजार रुपये लुटले आहे. 

'घटनेची वाच्यता केल्यास तुला कोंबडा बनवेल. माझ्याकडे अघोरी विद्या आहे'

पैसे देऊनही गुप्तधन आणि इतर कामे देखील झाली नसल्याने आपली फसवणूक झाल्याचे फिर्यादीला समजले आणि फिर्यादीनं सीताराम महाराजांकडे आपल्या पैशांची मागणी केली. आरोपीनं पैसे परत देण्यास नकार दिला. तसेच 'घटनेची वाच्यता केल्यास तुला कोंबडा बनवेल. माझ्याकडे अघोरी विद्या आहे', अशी भीती आरोपीनं फिर्यादीला दाखवली. या प्रकारानंतर अखेर रफत यांनी औरंगाबाद पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी आरोपी भोंदूबाबाला अटक केली असून पुढील तपास केला जात आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी