नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेंनी दिलेला शब्द पाळला, अखेर 'त्या' शिवसैनिकाच्या घराचे झाले भूमिपूजन

bhumi pujan of shivsainik sumant ruikars house :  महाराष्ट्राचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे हे दिलेला शब्द पाळतात याची प्रचीती पुन्हा एकदा आली आहे. कारण, दिवंगत शिवसैनिक सुमंत रुईकर (sumant ruikar) यांचं अर्धवट राहिलेलं घराचं स्वप्न अखेर एकनाथ शिंदे यांच्यामुळे पूर्ण झालं आहे.

bhumi pujan of shivsainik sumant ruikars house
नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेंनी दिलेला शब्द पाळला  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • यापूर्वी देण्यात आली होती ५ लाखाची मदत
  • एक कट्टर शिवसैनिक म्हणून सुमंत यांची मातोश्रीपर्यंत ओळख होती
  • नवस फेडण्यासाठी तब्बल ११०० किलोमीटर पायी जात असताना रस्त्यातच ते आजारी पडले होते

बीड :  महाराष्ट्राचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे हे दिलेला शब्द पाळतात याची प्रचीती पुन्हा एकदा आली आहे. कारण, दिवंगत शिवसैनिक सुमंत रुईकर (sumant ruikar) यांचं अर्धवट राहिलेलं घराचं स्वप्न अखेर एकनाथ शिंदे यांच्यामुळे पूर्ण झालं आहे. मंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) यांनी पुढाकार घेऊन शिवसैनिकाला घर बांधून दिलं आहे. शिवसैनिक सुमंत रुईकर यांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackery) यांना दीर्घायुष्य मिळावं यासाठी बीड येथून तिरुपती बालाजीला पायी चालत जात असताना अचानकपणेमृत्यू झाला होता. दरम्यान, आज स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनाचे औचित्य साधून सुमंत  रुईकर यांच्या बीडमधील नवीन घरकुलाचे भूमिपूजन पार पडले. या भूमीपूजन सोहळ्याला व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे उपस्थित राहून एकनाथ शिंदे यांनी रुईकर कुटुंबीयांच्या पाठीशी शिवसेना ठामपणे उभी असल्याचे स्पष्ट केले.

यापूर्वी देण्यात आली होती ५ लाखाची मदत

शिवसेनेचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी सुमंत रुईकर यांच्या संपूर्ण कुटुंबांची जबाबदारी घेतली असून आज प्राथमिक स्वरूपात त्यांना पाच लाख रुपयांची रोख मदत करण्यात आली होती. इतकंच नाहीतर लवकरच घर देखील बांधून देण्यात येईल असे आश्वासन मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते. मंत्री शिंदे यांनी व्हिडीओ कॉलद्वारे रुईकर यांच्या कुटुंबाशी संवाद साधला आणि त्यांना आधार दिला होता.

एक कट्टर शिवसैनिक म्हणून सुमंत यांची मातोश्रीपर्यंत ओळख होती

सुमीत यांच्या जाण्याने कुटुंबीय धाय मोकलून रडत आहेत. घरातले कर्तेधर्ते सुमंत यांच्या अचानक जाण्याने कुटुंबाला मोठा धक्का बसलाय. सुमंत यांच्या पाश्चात वृद्ध वडील, पत्नी आणि दोन मुले आहेत. कुटुंब प्रमुखच निघून गेल्याने आता जगायचे कसे हा मोठा प्रश्न कुटुंबासमोर उभा राहिला होता. पण शिवसेना कुटुंबियांच्या मागे ठाम आहे, असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे. त्याचबरोबर एक कट्टर शिवसैनिक म्हणून सुमंत यांची मातोश्रीपर्यंत ओळख होती.

नवस फेडण्यासाठी तब्बल ११०० किलोमीटर पायी जात असताना रस्त्यातच ते आजारी पडले होते 

बीडच्या एका शिवसैनिकाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दीर्घायुष्य लाभावं, यासाठी तिरुपतीला नवस बोलला होता आणि नवस फेडण्यासाठी तब्बल ११०० किलोमीटर पायी जात असताना रस्त्यातच ते आजारी पडले. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. आणि याचीच दखल आता शिवसेने घेतली आहे. 

मरेपर्यंत शिवसेनेची सेवा करणाऱ्या दिगंवत शिवसैनिकाच्या पत्नीने मुख्यमंत्र्यांकडे मागितली होती मदत

दरम्यानं , शिवसैनिकाच्या मृत्यूनंतर त्यांची पत्नी एकटीच पडली होती. पत्नीने उद्धव ठाकरे यांनी एक अर्ज केला होता. यामध्ये त्यांनी म्हटलं होत की, "उद्धवसाहेब, माझ्या नवऱ्याने उभं आयुष्य शिवसेनेला दिलं, आता त्यांच्या माघारी आम्हाला मदत करा", पतीच्या निधनानंतर, आमचं कुटुंब मात्र बेघर झालं आहे. असं शिवसैनिकाच्या पत्नीने अर्जात , म्हटलं होत. त्यानंतर त्यांना तातडीने शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांनी तातडीने मोठी मदत केली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी