Accident in Latur : लातूरमध्ये भीषण अपघात , अनेकांना दरवाजा तोडून बाहेर काढावं लागलं

big accident in latur three killed on the spo : लातूर जिल्ह्यातील (latur district) औसा येथे एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातात (Accident) तिघांचा मृत्यू झाला आहे. तर सात जण गंभीर जखमी झाले. जखमींना वाहनाचे दरवाजे तोडून बाहेर काढले आणि सरकारी दवाखान्यात नेले.

big accident in latur three killed on the spo
लातूरमध्ये भीषण अपघात , दरवाजा तोडून बाहेर काढावं लागल  
थोडं पण कामाचं
  • अपघातानंतर काळी-पिवळीला जोरदार धडक बसून ती रस्त्याच्या एका बाजूला पलटली
  • अपघात इतका भीषण होता की काळी पिवळीचा चक्काचूर झाला
  • अपघातात एकूण तिघांचा मृत्यू झाला असून, एकूण ७ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.

लातूर : लातूर जिल्ह्यातील (latur district) औसा येथे एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातात (Accident) तिघांचा मृत्यू झाला आहे. तर सात जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर सध्या लातूरच्या सरकारी दवाखान्यात उपचार सुरु आहे. मृतांमध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला असून, एकानं उपचारासाठी नेलं जात असताना प्राण सोडला आहे. सदर अपघात प्रचंड भीषण होता. अनेकांना दरवाजा तोडून बाहेर काढावं लागलं आहे. रात्रीच्या वेळेस हा अपघात झाला. भरधाव काळीपिवळी आणि बोलेरो (Mahindra Bolero) जीप एकमेकांना धडकून भीषण अपघात झाला. हा दरम्यान, या अपघातात एकूण तिघांचा मृत्यू झाला असून, एकूण ७ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.

या अपघातानंतर काळी-पिवळीला जोरदार धडक बसून ती रस्त्याच्या एका बाजूला पलटली

या अपघातानंतर दोन्ही वाहनांचा चक्काचूर झाला होता. त्यानंतर प्रवासी वाहतूक करणाऱ्या काळीपिवळीत अडकलेल्या प्रवाशांना गाडीचे दरवाजे तोडून बाहेर काढण्यात आलं आहे. सर्व प्रवाशी या गाडीत अडकले होते. लातूर-निलंगा रस्त्यावर दावतपूर पाटीजवळ हा भीषण अपघात झाला. या अपघातानंतर काळी-पिवळीला जोरदार धडक बसून ती रस्त्याच्या एका बाजूला पलटली होती. या धडकेत दोघा प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला असून, सात जण गंभीर जखमी झाले आहेत. या पैकी काही प्रवाश्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर येत आहे. 

अपघात इतका भीषण होता की काळी पिवळीचा चक्काचूर झाला

दरम्यान, वाघोली पाटीजवळ एका बोलेरो कार आणि काळीपिवळीची समोरासमोर जोरदार धडक झाली. हा अपघात इतका भीषण होता की काळी पिवळीचा चक्काचूर झाला. तर बोलेरो गाडी तब्बल १ दीडशे फूट लांब जाऊन खड्ड्यात पडली होती. शनिवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला होता. रात्री उशिरापर्यंत या अपघातातील मयतांची नावं कळू शकली नव्हती. प्रवासी वाहतूक करणाऱ्या काळीपिवळीतून ओशाहून लामजन्याकडे काही जण निघाले होते. तर एम एच २४ ए एफ  ०९५९ नंबरची बोलेरो कार लामजन्याहून औश्याकडे भरधाव निघाली होती. यावेळी हा अपघात घडला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी