उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का; 'या' बड्या नेत्याने जय महाराष्ट्र करत शिंदे गटात केला प्रवेश

Shiv Sena's one more leader join Shinde camp: एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी होणाऱ्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसून येत आहे. आता आणखी एका नेत्याने शिंदे गटात प्रवेश केला आहे. 

big jolt for uddhav thackeray as chandrakant khaire close associate narendra trivedi join shinde camp
उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का; 'या' बड्या नेत्याने जय महाराष्ट्र करत शिंदे गटात केला प्रवेश 
थोडं पण कामाचं
  • उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का
  • चंद्रकांत खैरे यांच्या समर्थकाचा शिंदे गटात प्रवेश
  • गेल्या २० वर्षांपासून शिवसेनेची महत्त्वाची जबाबदारी सांभाळत होते

Thackeray vs Shinde: एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेवर (Shiv Sena) दावा सांगितलेला असतानाच त्यांना मिळणारा पाठिंबाही दिवसेंदिवस वाढत आहे. तर शिवसेनेला लागलेली गळती काही थांबताना दिसत नाहीये. एकामागून एक असे नेते, पदाधिकारी, नगरसेवक, आमदार, खासदार हे शिंदे गटाला (Shinde camp) पाठिंबा देताना दिसून येत आहेत. त्यातच आता आणखी एक बडा नेता शिंदे गटात सहभागी झाला आहे. औरंगाबादचे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांचे कट्टर समर्थक आणि डावा हात समजले जाणारे नरेंद्र त्रिवेदी (Narendra Trivedi) यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे.

नरेंद्र त्रिवेदी यांची ओळख चंद्रकांत खैरे यांचे लेफ्ट हँण्ड म्हणून होती. गेल्या २० वर्षांपासून त्रिवेदी हे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख होते. मात्र, आता त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे आता मराठवाड्यात शिंदे गटाची ताकद आणखी वाढली आहे. 

१८ ऑगस्ट रोजी नरेंद्र त्रिवेदी यांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली आणि शिंदे गटात प्रवेश केला. यावेळी त्यांच्यासोबत जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राजेंद्र ठोंबरे आणि फुलंब्री कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती यांनीही शिंदे गटात प्रवेश केला आहे.

अधिक वाचा : 'मोहित कंबोजांचा स्ट्राईक रेट १०० टक्के'

नरेंद्र त्रिवेदी हे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख होते. त्यांनी शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे यांच्यावर निशाणा साधत शिंदे गटात प्रवेश केला आहे. आदित्य ठाकरे यांचा दौरा होता त्यावेळी बॅनरवर माझे नाव आणि फोटोही नव्हते. अंबादास दानवे यांचा आपल्या पदाधिकारी आणि सहकाऱ्यांवर दबाव असतो असंही नरेंद्र त्रिवेदी यांनी म्हटलं.

तर तिकडे चंद्रकांत खैरे यांनी नरेंद्र त्रिवेदी यांचे आरोप फेटाळून लावले आहेत. त्रिवेदी आणि त्यांच्यासोबतचे लोक हे शिंदे गटाच्या संपर्कात होते. त्याची कल्पना आम्हाला आधीपासूनच होती. नरेंद्र त्रिवेदी यांना कुठल्याही कार्यक्रमातून आम्ही वगळेले नव्हते असंही चंद्रकांत खैरे म्हणाले आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी