Aurangabad News: औरंगाबादमध्ये (Aurangabad) राष्ट्रवादी काँग्रेसच्या (National Congress Party) एका नेत्याच्या मुलाच्या लग्नात 700 जणांना विषबाधा झाल्याची माहिती मिळत आहे. लग्न समारंभाच्या जेवणातून विषबाधा झाल्यानं 700 जणांची प्रकृती बिघडली. या सर्वांना औरंगाबादच्या वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अब्दुल कदिर मौलाना (Abdul Qadeer Moulana) यांच्या मुलाचा काल (बुधवारी) लग्नसोहळा पार पडला. या सोहळ्यात आलेल्या पाहुण्यांना विषबाधा झाल्याची माहिती मिळत आहे. ( Big news! 700 people poisoned at NCP leader's son's wedding)
अधिक वाचा : रिषभ पंतचे मुंबईत होणार ऑपरेशन, एअरअँब्युलन्सने केले शिफ्ट
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, राष्ट्रवादीचे नेते कदीर मौलाना यांचे पुत्र सय्यद जुबेर यांचा विवाहसोहळा औरंगाबादमध्ये थाटामाटात पार पडला. यावेळी मोठ्याप्रमाणावर लोकांना आमंत्रण देण्यात आले असल्याने, लग्नात गर्दी देखील मोठी होती. यावेळी मुलीकडच्या लोकांनी आलेल्या पाहुण्यांसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या पदार्थांची मेजवानी केली होती. वेगवेगळ्या प्रकारचे पकवान बनवण्यात आले.
अधिक वाचा : काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी हॉस्पिटलमध्ये
जेवण केल्यानंतर मात्र वऱ्हाडी लोकांना विषबाधा झाली. कुणाला पोटाचा त्रास होऊ लागला तर कुणाला मळमळ होऊ लागली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तब्बल 700 जणांना विषबाधा झाल्याने एकच गोंधळ उडाला होता.या सर्वांवर वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान बहुतांश रुग्णांना रात्रीच डिस्चार्ज देण्यात आला आहे.
याबाबत कदीर मौलाना यांच्या समर्थकांनी दिलेल्या माहितीनुसार, काही लोकांना त्रास होत होता. मात्र कोणेही गंभीर नाही. तसेच सर्वांना रात्रीची तपासून डॉक्टरांनी तात्काळ सुट्टी दिली आहे. त्यामुळे कोणेही गंभीर नाहीत. तसेच हा सर्व प्रकार कदीर मौलाना यांच्या घरी घडला नसून, जेवणाचा कार्यक्रम मुलीकडे होता. तर कदीर मौलाना यांच्याघरी होणारा कार्यक्रम आज आहे. त्यामुळे अफवांवर विश्वास ठेवू नका असे , कदीर मौलाना यांच्या समर्थकाने प्रतिक्रिया दिली आहे.