Arjun Khotkar: औरंगाबाद: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांची शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांनी २५ जुलै रोजी भेट घेतली. या भेटीनंतर अर्जुन खोतकर हे एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाले असल्याची माहिती शिंदे गटातीलचं काही नेत्यांनी दिली आहे. यानंतर अर्जुन खोतकर हे पुन्हा रावसाहेब दानवे यांच्या भेटीला गेले असता खोतकर यांच्या चेहऱ्यावर मोठ्या प्रमाणात तणाव जाणवत असरल्याचं देखील पहायला मिळालं. यावेळी, पत्रकारांनी खोतकर यांना प्रश्न विचारला की, शिंदे गटात समील होण्यासाठी ईडीचा दबाव आहे का? यावर, खोतक सूचक वक्तव्य करत म्हणाले माझ्यावर त्याच गोष्टीचा ताण आहे.
अधिक वाचा ; लवकरच 5G नेटवर्क; 'अशी' बदलणार कॉल, इंटरनेट वापरण्याची पद्धत
पुढे बोलताना अर्जुन खोतकर म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माझी योगायोगाने भेट झाली आहे. शिंदे यांच्या भेटीनंतर मी चहा-नाष्ट्यासाठी रावसाहेब दानवेंकडे आलो आहे. मी दिल्लीत का आहे याची माहिती माध्यमं काढू शकतात. कदाचित तोच ताण माझ्या चेहऱ्यावर दिसत असल्याचंही खोतकर यांनी म्हटलं आहे. दरम्यान, मी दिल्लीला आहे याचे वेगळे अर्थ कुणी काढू नये. मी दिल्लीला का आहे याची कारणं सर्वांना असल्याचही खोतकर यांनी म्हटलं आहे.
अधिक वाचा ; जालियनवाला बागेतील विहीरीत नाही दिसणार पैसा, जाणून घ्या का?
नाही त्या गोष्टींमध्ये अडचणी निर्माण केल्या जात आहेत. काय करणार? असा सवाल देखील खोतकर यांनी माध्यमांनाच केला आहे. कुटुंबाचा व इतर गोष्टींचा खूप तणाव आहे.” असा हतबल प्रश्न अर्जुन खोतकर यांनी विचारला. तसेच मी या विषयावर जालन्याला केल्यावर सविस्तर बोलणार असल्याचंही खोतकर यांनी म्हटलं. आर्थिक संकट असेल तर कुणीही सेफ व्हायचा प्रयत्न करेन असंही खोतकर म्हणाले.
अधिक वाचा ; "... तर तुमचे लवंडे कसे वागले असते" शेलारांची ठाकरेंवर टीका
शिवसेना नेते तथा माजी मंत्री अर्जुन खोतकर (ex minister arjun khotkar) यांच्यावर मनी लाँड्रिंग (Money laundering) प्रकरणात ईडीने मोठी कारवाई करण्यात आली होती. ईडीने तब्बल खोतकर यांची ७८ कोटी ३८ लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. दरम्यान, जप्त करण्यात आलेली मालमत्ता ही अर्जुन खोतकर यांच्याशी संबंधित असल्याचे ईडीने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. रामनगर येथील जालना सहकारी साखर कारखान्याची २०० एकर जमीन, कारखाना इमारत आणि मशीन अशी मालमत्ता ईडीकडून जप्त करण्यात आली आहे.