Aurangabad : औरंगाबादमध्ये भाजप आणि शिवसेनेच्या गटात तुंबळ हाणामारी, 'या' कारणामुळे झाला वाद

BJP and Shiv Sena worker clash in Aurangabad : भाजप आणि शिवसेनेच्या दोन गटात झालेल्या वादानंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण देखील होते. याप्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात अद्याप तक्रार दाखल झाली नसल्याची माहिती समोर येत आहे.

BJP and Shiv Sena worker clash in Aurangabad
औरंगाबादमध्ये भाजप आणि शिवसेनेच्या गटात तुंबळ हाणामारी  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • सिमेंट बाकडे तोडल्याच्या कारणावरुन भाजप आणि शिवसेनेच्या दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी
  • संध्याकाळी साडेसातच्या सुमारास औरंगाबादच्या वाळूज महानगरमध्ये सदर हाणामारीची घटना घडली
  • ग्रामपंचायत निवडणुकीसाठी दोन्ही पक्षांकडून जंगी तयारी सुरु

औरंगाबाद : सिमेंट बाकडे तोडल्याच्या कारणावरुन भाजप आणि शिवसेनेच्या दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सोमवारी (२५ एप्रिल) रोजी संध्याकाळी साडेसातच्या सुमारास औरंगाबादच्या वाळूज महानगरमध्ये सदर हाणामारीची घटना घडली आहे. भाजप आणि शिवसेनेच्या दोन गटात झालेल्या वादानंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण देखील होते. याप्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात अद्याप तक्रार दाखल झाली नसल्याची माहिती समोर येत आहे. सदर घटनेत दोघे जखमी झाले आहेत. एकाच्या डोक्याला मार लागल्याने त्याला उपचारासाठी घाटीमध्ये दाखल करण्यात आले आहे.

अधिक वाचा : राज ठाकरेंच्या सभेचा टीझर प्रदर्शित होताच औरंगाबादेत जमावबंद

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी दोन्ही पक्षांकडून जंगी तयारी सुरु

मिळालेल्या माहितीनुसार सदर घटना ही ग्रामपंचायत निवडणुकीच्या वादातून झाली असल्याची माहिती मिळाली आहे. कारण, वाळूज एमआयडीसीमधील बजाजनगर वडगाव कोल्हाटी इथल्या वॉर्ड क्रमांक तीनमध्ये होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी युवा सेनेचे आणि भाजप युवा मोर्चाचे पदाधिकारी इच्छुक आहेत. त्यामुळे, होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी दोन्ही पक्षांकडून जंगी तयारी सुरु असल्याची देखील माहिती मिळाली आहे. होर्डिंग लावणे, परिसरात कार्यक्रम घेणे असे कार्यक्रम युवा सेनेचे आणि भाजप युवा मोर्चा कडून घेतले जात असल्याने दोन्ही दोन्ही गटांत धुसफूस सुरु आहे.

अधिक वाचा : कंगना राणावतचा विनयभंग? रिएलिटी शोमध्ये शेअर केले रहस्य 

भाजपच्या वतीने बसवण्यात आलेले बाकडे तोडले आणि सुरु झाला वाद

ग्रामपंचायत निवडणुकीच्य पार्श्वभूमीवर भाजपच्या पंचायत समिती सदस्याच्या पुढाकारातून रांजणगाव येथील लोकमान्य चौकात सिमेंटचे चार बाकडे बसवण्यात आले होते. यासाठी भाजप युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्याने पुढाकार घेतला होता.  मात्र, २४ एप्रिल रोजी सोशल मिडिया वरती एक अज्ञात लोकांनी हे बाकडे तोडले असल्याची पोस्ट फिरू लागली. सदर पोस्टनंत दिवसभर वातावरण तापले होते. हे बाकडे युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यानेच तोडले असा समाज भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांमध्ये पसरली यानंतर बाकडे तोडल्याचा जाब विचारण्यासाठी पाच ते सहा कार्यकर्ते लोकमान्य चौकात गेले असता तिथे युवा सेना आणि युवा मोर्च्याच्या कार्यकर्त्यामध्ये बाचाबाची सुरु झाली. आणि त्यांनतर हाणामारी झाल्याने दोन्ही गटांतील दोघे जखमी झाले. एकाच्या डोक्याला दुखापत झाल्याने त्याला घाटीमध्ये दाखल केलं आहे. या हाणामारी प्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत तक्रार दाखल झाली नसल्याची माहिती मिळाली आहे

अधिक वाचा ; भारतीय तटरक्षक दलाने बोटीतून जप्त केलं 280 कोटींचे हेरॉईन

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी