Andheri Bypoll :अंधेरी पोटनिवडणुकीत भाजपने 'नोटा'साठी पैसे वाटले, अंबादास दानवेंचा गंभीर आरोप

BJP distributed money for 'notes' in Andheri by-election - Danve ; निवडणुकीदरम्यान नोटाचा मोठ्या प्रमाणात करण्यात आला आहे. ज्यांनी नोटाचा प्रचार केला ते लोक भाजपचे होते निश्चितच या निवडणुकीत नोटाचा प्रचार करण्याचा आरोप हा भाजपवर लागतो, असे दानवे म्हणाले आहेत.

BJP distributed money for 'notes' in Andheri by-election - Danve
अंधेरी पोटनिवडणुकीत भाजपने 'नोटा'साठी पैसे वाटले - दानवे   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला
  • भाजपने अंधेरी पोटनिवडणुकीत नोटा या पर्यायाला पसंती देण्यासाठी पैसे वाटले
  • ज्यांनी नोटाचा प्रचार केला ते भाजपचे लोक होते

Andheri Bypoll : औरंगाबाद : विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. भाजपने अंधेरी पोटनिवडणुकीत नोटा या पर्यायाला पसंती देण्यासाठी पैसे वाटल्याचा गंभीर आरोप अंबादास दानवे यांनी केला आहे. दरम्यान, अंधेरी पोटनिवडणुकीचा निकाल आता जवळपास स्पष्ट झाला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांचा विजय जवळपास निश्चित झाला आहे. या निवडणुकीतून भाजपने माघार घेतली होती. पण, या निवडणुकीत नोटा या पर्यायाला मोठ्या प्रमाणात मते मिळाली असल्याचे या निकालात स्पष्टपणे दिसून आले आहे. त्यामुळे, अंबादास दानवे यांनी असा गंभीर आरोप भाजपवर केला आहे. (bjp distributed money for nota option in Andheri by election, shivasena uddhav balasaheb thackeray party ambadas danve allegation on bjp)

अधिक वाचा ; IND Vs ZIM: उपांत्य फेरीसाठी आज भारत- इिम्बाब्वे आमने-सामने

ज्यांनी नोटाचा प्रचार केला ते भाजपचे लोक होते

दरम्यान, अंबादास दानवे यांनी म्हटलं आहे की, या निवडणुकीत नोटाला दुसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक मते मिळाली आहेत. त्यामुळे, निवडणुकीदरम्यान नोटाचा मोठ्या प्रमाणात करण्यात आला आहे. ज्यांनी नोटाचा प्रचार केला ते लोक भाजपचे होते निश्चितच या निवडणुकीत नोटाचा प्रचार करण्याचा आरोप हा भाजपवर लागतो, असे दानवे म्हणाले आहेत. अंधेरी पोटनिवडणुकीचा निकाल सध्या जाहीर होत आहे. यामध्ये शिवसेनेच्या उमेदवार ऋतुजा लटके यांचा विजय निश्चित मानला जात असला तरी नोटाला दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक मते मिळाले आहेत. यावरून आता राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

अधिक वाचा ; महिला आपल्याच मुलाच्या मुलीची झाली आई, नातीला दिला जन्म

ऋतुजा लटके या 11 व्या फेरीमध्ये 42343 मत घेऊन आघाडीवर आहेत.

अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीचा निकाल जवळपास आता स्पष्ट झाला आहे. आतापर्यंत एकूण 11 फेरींचा निकाल  हाती आला असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांनी मोठी आघाडी घेतली आहे. पण, दुसरीकडे इतर उमेदवारांपेक्षा नोटाला जास्त लोकांनी पसंती दिली आहे.  ऋतुजा लटके या 11 व्या फेरीमध्ये 42343 मत घेऊन आघाडीवर आहे.

अधिक वाचा ; D Gang: दाऊद इब्राहिम-छोटा शकीलविरुद्ध NIAची मोठी कारवाई 

गुलाबराव पाटलांच्या वक्तव्यावर आमदार अंबादास दानवे यांनी दिली प्रतिक्रिया

'राजकारणातील सगळ्या पक्षातील नेत्यांनी स्त्रियांचा आदर केला पाहिजे गुलाबराव पाटलांचे ते वक्तव्य म्हणजे स्त्रियांचा एक प्रकारे अवमानच आहे, अशी प्रतिक्रिया गुलाबराव पाटलांच्या वक्तव्यावर आमदार अंबादास दानवे यांनी दिली. राज्यात कधी नव्हे ते पहिल्यांदाच एखाद्या पोटनिवडणुकीत राजकीय नाट्य पाहण्यास मिळाले असं देखील अंबादास दानवे यांनी म्हटलं आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी