बबनराव लोणीकरांच्या अडचणीत वाढ, अॅट्रॉसिटीची तक्रारही दाखल! सखोल चौकशीचे राऊत यांनी दिले आदेश

BJP leader Babanrao Lonikar's troubles increase : औरंगाबादेतील गुणरत्न सोनवणे आणि नागराज गायकवाड या दोघांनी औरंगाबाद पोलीस आयुक्त कार्यालयात ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. दलित समाजाचा अपमान केल्यामुळे अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.

BJP leader Babanrao Lonikar's troubles increase
बबनराव लोणीकरांच्या अडचणीत वाढ, अॅट्रॉसिटीची तक्रारही दाखल  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • भारतीय जनता पार्टीचे नेते बबनराव लोणीकर यांच्या अडचणीत वाढ
  • संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी लोणीकर यांच्यावर अ‍ॅट्रॉसिटी दाखल करण्याची तक्रार पोलिसांत दिली
  • औरंगाबाद पोलीस आयुक्त कार्यालयात ही तक्रार दाखल

औरंगाबाद : भारतीय जनता पार्टीचे नेते बबनराव लोणीकर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. कारण, काल बबनराव लोणीकर यांची एक ऑडीओ क्लिप सोशल मिडिया वरती प्रचंड मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली होती. या ऑडीओ क्लिपमध्ये बबनराव लोणीकर हे एका कर्मचाऱ्याला धमकावत देखील असल्याचं समोर आले आहे. सदर प्रकरणी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार चौकशी सुरु करण्यात आल्याची माहिती महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक मंगेश गोंदवले यांनी यांनी दिली आहे. इतकंच नाही तर लोणीकर यांच्या विरोधात अॅट्रॉसिटीची (Atrocity) तक्रारही दाखल करण्यात आली आहे. दुसरीकडे काही संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी लोणीकर यांच्यावर अ‍ॅट्रॉसिटी दाखल करण्याची तक्रार पोलिसांत दिली आहे. त्यामुळे भाजप नेते बबनराव लोणीकर हे अडचणीत येण्याची शक्यता वर्तवली जाऊ लागली आहे.

अधिक वाचा : 'एप्रिल फूल'निमित्त मस्करी करण्याच्या या आहेत भन्नाट आयडिया

औरंगाबाद पोलीस आयुक्त कार्यालयात ही तक्रार दाखल

औरंगाबादेतील गुणरत्न सोनवणे आणि नागराज गायकवाड या दोघांनी औरंगाबाद पोलीस आयुक्त कार्यालयात ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. दलित समाजाचा अपमान केल्यामुळे अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. त्याचबरोबर  “ज्या अधिकाऱ्याला अशी धमकी मिळाली त्यांना गरज भासल्यास पोलीस संरक्षण देण्यात येईल. या विषयाबद्दल सखोल माहिती घेऊन पोलिसांकडे तक्रार करण्याचे आदेश मी औरंगाबाद येथील महावितरणचे सह व्यवस्थापकीय संचालक यांना दिले आहेत,” असं मंत्री राऊत म्हटलं आहे. दरम्यान, बबनराव लोणीकर यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिलेली धमकी व वापरलेल्या आक्षेपार्ह भाषेबद्दल राऊत यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून लोणीकर यांच्याविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.

अधिक वाचा : शादी का लड्डू' खाऊन पोलीस दादाला आला पश्चाताप

आयकर विभागची धाड टाकीन, तुम्ही कुठं संप्तती घेतली, कुठे पैसे कमावता, आम्ही तुमची माहिती ठेवतो लोणीकर

दरम्यान, आमदार बबनराव लोणीकर यांनी अधिकाऱ्याला फोनवर चांगलाच दम भरला असल्याचं समोर आलं आहे. व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये लोणीकर म्हणतात की, आम्ही नियमीत बिल भरतो. मीटर काढून नेलं आणि तू नाही कसं म्हणतो. आयकर विभागची धाड टाकीन, तुम्ही कुठं संप्तती घेतली, कुठे पैसे कमावता, आम्ही तुमची माहिती ठेवतो असंही आमदार बबनराव लोणीकर यांनी महावितरणच्या कर्मचाऱ्याला धमकावलं आहे. औरंगाबादमधील सातारा परिसरातील बंगल्याचे मीटर काढून नेल्याने आमदार बबनराव लोणीकर यांनी वीज कर्मचाऱ्याला शिवीगाळ केली. बिल भरलं तरी बंगल्याचं मीटर का काढलं? तिकडे झोपडपट्टीत जाऊन मीटर काढा असंही बबनराव लोणीकर यांनी म्हटलं आहे. लोणीकर यांची ही ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर लोणीकर यांच्यावर सर्व स्तरातून टीका होऊ लागली आहे.

अधिक वाचा : MS Dhoni income: गेल्या वर्षात धोनीची तब्बल इतकी कमाई वाढली 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी