Chandrakant Patil : फुले, आंबेडकरांनी शाळा सुरू करण्यासाठी भीक मागितली, भाजप नेते चंद्रकांतदादा पाटील यांचे वादग्रस्त विधान

Chandrakant Patil : गेल्या काही दिवसांत भाजप नेत्यांकडून वादग्रस्त विधानं करण्याची मालिका सुरू आहे. आता भाजप नेते चंद्रकांतदादा पाटील यांनीही एक वादग्रस्त विधान केले आहे. फुले आणि आंबेडकर यांनी भीक मागून शाळा सुरू केली होती असे वादग्रस्त विधान चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. औरंगाबादमध्ये एका कार्यक्रमात ते बोलत होते.

थोडं पण कामाचं
  • भाजप नेते चंद्रकांतदादा पाटील यांनीही एक वादग्रस्त विधान केले आहे.
  • फुले आणि आंबेडकर यांनी भीक मागून शाळा सुरू केली होती
  • असे वादग्रस्त विधान चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.

Chandrakant Patil : औरंगाबाद : गेल्या काही दिवसांत भाजप नेत्यांकडून वादग्रस्त विधानं करण्याची मालिका सुरू आहे. आता भाजप नेते चंद्रकांतदादा पाटील यांनीही एक वादग्रस्त विधान केले आहे. फुले आणि आंबेडकर यांनी भीक मागून शाळा सुरू केली होती असे वादग्रस्त विधान चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. औरंगाबादमध्ये एका कार्यक्रमात ते बोलत होते. (bjp leader chandrakant patil controversial statement on mahatma phule and doctor babasaheb ambedkar)

चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की शैक्षणिक संस्थांनी सरकारी अनुदानावर अवलंबून राहू नये. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांनी भीक मागून शाळा सुरू केल्या असे पाटील म्हणाले. त्यामुळे शैक्षणिक संस्थांनी सरकारवर अवलंबून राहू नये. कॉर्पोरेट सोशल रीस्पॉन्सिबिलिटीच्या माध्यमातून शैक्षणिक संस्थांनी निधी उभारावा असे पाटील म्हणाले. 

यापूर्वी भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांनी औरंगजेबाकडे पाच वेळा माफी मागितली होती असे विधान केले होते. तसेच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज हे जुन्या काळाचे आदर्श आहेत, नितीन गडकरी नव्या काळाचे आदर्श आहेत असे कोश्यारी म्हणाले होते. त्यामुळे एकच वाद निर्माण झाला होता. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी पक्षाने राज्यपालांना हटवा अशी मागणीही केली होती. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी