'या' मोर्चातही पंकजा मुंडे गैरहजर, मुंडेंची गैरहजेरी राजकीय वर्तुळाला विचार करायला भाग पाडणारी

bjp leader pankaja munde absent from jalna water rally : पंकजा मुंडे यांना भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत त्यांना स्थान देण्यात आलं आहे. मध्य प्रदेश सरकारच्या त्या प्रभारी आहेत. तिथे सक्रिय असल्यामुळे मराठवाड्याकडे त्यांचं दुर्लक्ष होतंय की, भाजपअंतर्गत कुरघोडींमुळे त्यांना नमतं घेत इकडे दुरावा साधावा लागतोय, असा प्रश्न कार्यकर्त्यांना पडला आहे.

bjp leader pankaja munde absent from jalna water rally
'या' मोर्चातही पंकजा मुंडे गैरहजर  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • विधानपरिषदेची उमेदवारी नाकारल्यानंतर पंकजा मुंडे या नाराज असल्याची
  • औरंगाबादप्रमाणेच जालन्यातही पंकजा मुंडे गैरहजर आहेत
  • पंकजा मुंडेंची मराठवाड्यातील गैरहजेरी राजकीय वर्तुळाला विचार करायला भाग पाडणारी

जालना : भाजपच्या नेत्या तथा माजी मंत्री पंकजा मुंडे यांना भाजपने विधानपरिषदेची उमेदवारी नाकारल्यानंतर पंकजा मुंडे या नाराज असल्याची माहिती आहे. दरम्यान, विधानपरिषदेतील उमेदवारी नाकारण्यात आल्यानंतर पंकजा मुंडे नाराज आहेत. महाराष्ट्रातील अनेक कार्यक्रम आणि मोर्चांमधूनही त्यांना डावलण्यात आल्याचं चित्र आहे. आज भाजपच्या वतीने जालना शहरात प्रश्नावर विराट मोर्चा काढण्यात आला असून, या मोर्चात औरंगाबादप्रमाणेच जालन्यातही पंकजा मुंडे गैरहजर आहेत. औरंगाबादच्या मोर्चाप्रमाणेच देवेंद्र फडणवीस यांनी या मोर्चाचे नेतृत्व केलं आहे. या मोर्चाची जय्यत तयारी मंत्री रावसाहेब दानवेंनी (Raosaheb Danve)  केली आहे.

अधिक वाचा : VIdeo: टी-२० आहे की कसोटी?  कर्णधार बेन स्टोक्सने लावली आग

पंकजा समर्थकांनी ठिकठिकाणी भाजप श्रेष्ठींपर्यंत आपली नाराजीही पोहोचवली आहे 

दरम्यान, पंकजा मुंडे या अनेक दिवसांपासून भाजपच्या कार्यक्रमात दिसत नाहीत. त्यामुळे त्या नाराज असल्याच्या चर्चा आहेत. खुद्द पंकजा मुंडेंनी याबाबत नाराजी व्यक्त केली नसली तरीही त्यांच्या समर्थकांमधून ही अस्वस्थता अधिक तीव्रतेने उफाळून येत असल्याचं पहायला मिळत आहे. मुंबईतल्या ओबीसी आरक्षणासाठीच्या (OBC reservation) मोर्चापासून औरंगाबाद, जालन्यातील मोर्चातही पंकजांचं अस्तित्व कुठेही दिसून आलं नाही. त्यामुळे, त्या नाराज असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, मराठवाड्यात पंकजा समर्थकांनी ठिकठिकाणी भाजप श्रेष्ठींपर्यंत आपली नाराजीही पोहोचवली. पण पंकजा मुंडे यांचं मात्र मौन अद्याप तरी कायम असल्याचं पहायला मिळत आहे.

अधिक वाचा : घरासाठी नवीन गॅस कनेक्शन घेताय मग खिश्यात ठेवा मोठी रक्कम 

पंकजा मुंडेंची मराठवाड्यातील गैरहजेरी राजकीय वर्तुळाला विचार करायला भाग पाडणारी

एकूणच आगामी महापालिका निवडणुकांच्या तोंडावर प्रचंड जनाधार असलेल्या पंकजा मुंडेंची मराठवाड्यातील गैरहजेरी राजकीय वर्तुळाला विचार करायला भाग पाडणारी आहे. पंकजा मुंडे यांना भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत त्यांना स्थान देण्यात आलं आहे. मध्य प्रदेश सरकारच्या त्या प्रभारी आहेत. तिथे सक्रिय असल्यामुळे मराठवाड्याकडे त्यांचं दुर्लक्ष होतंय की, भाजपअंतर्गत कुरघोडींमुळे त्यांना नमतं घेत इकडे दुरावा साधावा लागतोय, असा प्रश्न कार्यकर्त्यांना पडला आहे.

अधिक वाचा : फाटलेली-जुनी पर्स फेकताय? त्याआधी करा हे काम, व्हाल मालामाल

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी